शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

विवाहितेचा आरमोरीत संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: July 9, 2016 02:19 IST

येथील जवाहर कॉलनीतील सेवानिवृत्त प्राध्यापक रामसिंग राठोड यांच्या मुलाचे लग्न एक वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील ...

तणावपूर्ण वातावरणात पुलगावात अंत्यसंस्कारपुलगाव : येथील जवाहर कॉलनीतील सेवानिवृत्त प्राध्यापक रामसिंग राठोड यांच्या मुलाचे लग्न एक वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील मोहन चव्हाण यांच्या मुलीशी झाले होते. मुलगा निलेश व स्रुषा जान्हवी हे नोकरीनिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे राहत होते. अशातच ६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला; परंतु आपल्या मुलीचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार मुलीच्या वडिलांने तर प्रा. राठोड यांनी मारहाण केल्याची तक्रार केल्याची चर्चा आहे. प्रकरणासंदर्भात शहरात विविध चर्चा सुरू असतानाच गुरुवारी रात्री १.३० वाजता तणावपूर्ण वातावरणात स्थानिक स्मशानभूमीवर जान्हवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. जवाहर कॉलनी येथील प्रा. राठोड यांचा मोठा मुलगा निलेश हा आरमोरी येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याचा एक वर्षांपूर्वी दारव्हा येथील मोहन चव्हाण यांच्या मुलीशी विवाह झाला. दोघेही आरमोरी येथे वास्तव्यास होते. लहान मुलगा अक्षय हा अभियांत्रिंक महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ६ जुलैच्या सायंकाळी जान्हवीचा मृत्यू झाल्याची सूचना जान्हवीच्या वडिलांना मिळाली. नंतर त्यांनी १०-१२ नातलगासह आरमोरी गाठले. तेथील परिस्थिती पाहून त्यांच्या दुखा:चा उद्रेक होऊन त्यांनी तिथे उपस्थित असलेले मुलीचे सासरे, जावई निलेश यांच्याशी वाद केला. तर मोहन चव्हाण यांनी मुलीच्या मृत्यूवर आक्षेप घेत परस्पराविरोधात आरमोरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली. मृतकाचे शवविच्छेदन आरमोरी येथे करण्यात आले. जान्हवीच्या वडिलांनी हरकत घेतल्यामुळे शवविच्छेदन गुरुवारी गडचिरोली येथे करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकरणी आरमोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानक जान्हवीचे शव माहेरच्या मंडळीसह प्रा. राठोड यांच्या निवासस्थानी पोहचले. यावेळी सासरच्या मंडळीवर आरोप प्रत्यारोपामुळे काही काळ जणाव निर्माण झाला होता. परंतु काहींच्या मध्यस्थीमुळे रात्री स्थानिक पंचधारा स्मशानभूमीत मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे अनधिकृत वृत्त आहे. या प्रकरणी आरमोरी पोलीस तपास करीत असून मृत्यूचे कारण कळू शकले नाही.(तालुका प्रतिनिधी)