शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

घुशींनी पोखरली अनेक घरे

By admin | Updated: November 12, 2014 22:49 IST

गावात तसेच आजुबाजूच्या परिसरात दोन वर्षापूर्वी माकडांनी धुमाकुळ घातल कौलारू घरांची चाळणी केली. तो त्रास कमी होत नाही तोच आता घर पोखरत असलेल्या घुशींनी नागरिकांना हैराण करून सोडले आहे.

साहूर : गावात तसेच आजुबाजूच्या परिसरात दोन वर्षापूर्वी माकडांनी धुमाकुळ घातल कौलारू घरांची चाळणी केली. तो त्रास कमी होत नाही तोच आता घर पोखरत असलेल्या घुशींनी नागरिकांना हैराण करून सोडले आहे. गावांतील असंख्य घरे घुशींनी पोखरली असून ती पडण्याच्या मार्गावर आहे. मातीचे असो किंवा सिमेंटचे घर असो, एकदा घशीला जागा मिळाली की खालून घर पोकळ करयाला ती सुरुवात करते. त्यामुळे अनेक घरे ढासण्याच्या स्थितीत आहेत. या घुशींच्या अंगावर पिसूळ होत असतात. त्यामुळे विविध रोगांची लागण होण्याची सुद्धा भीती गावोगावी पसरली आहे. साहूर परिसरातील अनेक गावांमध्ये दोन वर्षापासून माकडांनी घरावरची केवलू फोडून घराची चाळणी केली. तसेच घरावर वाळत असलेल्या अन्नधान्याचे मोठे नुकसान केले. गावकऱ्यांची ओरड बघून वनविभागाने माकडांना पिटाळून लावले. त्यामुळे माकडांचा हैदोस काही प्रमाणात कमी झाला. ही समस्या कमी होत नाही तोच आता घुशींनी घ्रे पोखरायला सुरुवात केली आहे. स्वस्त धान्याचे दुकान, धान्याचे गोडावून, जनावरांचे गोठे, शाळा, सरकारी इमारती किंवा घराला कुलूप लाऊन बाहेरगावी गेलेल्याची घरे पोकळ केल्याचे प्रकार वाढत आहे. एकट्या साहूर गावातच तिनशे घरे ढासळण्याच्या टप्प्यावर आहे. रात्री हैदोस घालणाऱ्या घुशी आता भरदिवसासुद्धा हैदोस घालत आहे. एक ते तीन किलो वजनाची घुस एकावेळी आठ दहा पिलांना जन्म देत असल्याने घुशींचे प्रमाणही गावात भयंकर वाढले आहे. घुशीला पकदणे सहज शक्य नसते. पिजऱ्यांतही ती सहज सापडत नाही. त्यामुळे विद्युत करंटद्वारे घूस मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्यातही अनेकांना ईजा पोहचत आहे. गावातील शंकर नांदने यांनी मासोळीच्या जाळ्यात एकावेळी सहा घुसी मारल्या. त्यामुळे सर्व जण आता तोच मार्ग अवलंबवित आहे. घुस ही गांडूळ, किडेव व धान्य खात असल्यामुळे हे खाद्य तिला बाराही महिने सहज मिळत असते. माकडांसोबत घुशीसुद्धा गावोगावच्या नागरिकांना त्रस्त करीत आहे. माकडांपुढे वनविभागाने हात टेकले आहे. आता या घुशीचा कोण बंदोबस्त करणार असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. घुशीला मारण्यासाठी नागरिक आपल्या अंथरुणाजवळ काड्या, दगड घेऊन झोपतात. गावोगावच्या ग्रामपंचायतीनी यावर काहीतरी तोडगा काढावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.(वार्ताहर)