शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

प्रियदर्शिनीचे वर्धा जिल्ह्याशी अनेक ऋणानुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:08 PM

‘प्रियदर्शिनी’ या नावाने सर्वपरिचित असलेल्या इंदिरा गांधी यांचे वर्धा जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत.

ठळक मुद्देइंदिरा गांधी जयंती विशेष : महात्मा गांधी आणि विनोबा यांच्या अनेकदा घेतल्या भेटी

आॅनलाईन लोकमतवर्धा : ‘प्रियदर्शिनी’ या नावाने सर्वपरिचित असलेल्या इंदिरा गांधी यांचे वर्धा जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. आणीबाणीचा काळ असो वा सत्ता उपभोगण्याची वेळ असो, त्या वर्धेत आल्याचेच दिसून आले आहे. येथील सेवाग्राम आश्रम आणि भूदानाचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचा पवनार आश्रम इंदिरा गांधींकरिता नेहमी उर्जेचे स्त्रोतच राहिला आहे.इंदिराजींना दिली पवनारने संजीवनीइंदिरा गांधी व संजय गांधी यांचा पराभव झाल्यानंतर देशात जनता पक्षाचे सरकार आले. या काळात इंदिरा गांधी एकट्या पडल्या होत्या. त्यांनी वर्धा येथून पवनार आश्रमात आचार्य विनोबा भावे यांची भेट घेतली व येथून सरकारच्या विरोधात आक्रमक होण्याचे निश्चित केले. त्यानंतर काँग्रेसला देशात प्रचंड मोठा जनाधार मिळाला. सत्ता जात-येत असते; पण आपले पाय जमिनीवर कायम असावे लागतात, असा उल्लेख इंदिरा गांधी जयंतीच्या पुर्वसंध्येला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी वर्धा येथे केला.विनोबांकडून इंदिराजींना अनेकदा मार्गदर्शनआचार्य विनोबा भावे यांनी इंदिरा गांधींना सत्तेवर असताना व नसतानाही अनेकदा मार्गदर्शन केले. इंदिरा गांधींनी १९७५ ते ७७ या काळात लागू केलेल्या आणीबाणीलाही विनोबांनी अनुशासन पर्व, असे सांगून त्यांचे समर्थन केले. इंदिरा गांधीजींच्या अडचणींच्या काळात त्या नेहमीच सेवाग्राम व पवनार आश्रमला भेट देत होत्या. त्यांनी वर्धा जिल्ह्याशी आपली नाळ कधीही तुटू दिली नाही.सेवाग्राम आश्रमात वृक्षारोपण आणि संदेशसेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमात येत त्यांनी अनेकवेळा सभा घेतल्या. येथे आल्यानंतर त्यांनी १४ आॅक्टोबर १९७२ रोजी वृक्षारोपण केले. त्यांनी लावलेले बेलाचे वृक्ष आज इतरांना फळ देणारे ठरत आहे. हा बेल वृक्ष आश्रम परिसरात असून त्यावरील पाटी सर्वांना इंदिरा गांधी यांची आठवण करून देणारी ठरत असल्याचे आश्रम प्रतिष्ठान सांगत आहे.केळीचा घड भेटइंदिराजी नागपूरवरून पवनारकडे येताना सेलू येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करताना ८० किलो वजनाचा केळीचा घड भेट दिला. यावेळी खजिनदार सीताराम केसरी हजर होते. इंदिराजींनी ‘इंदिरा दिल्ली मे क्या कर रही है ये आप गाँव मे देख सकेंगे’, असा उल्लेख केला. त्यावेळी दिल्लीत कृष्णधवल टेलीव्हीजन सुरू झाले होते.