वर्धा : केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांची विविध कामांना उपस्थिती राहणार आहे. सकाळी ९.१५ वाजता सेवाग्राम येथे आगमन व आश्रमास भेट, १० वाजता करूणाश्रम पिपरी (मेघे) येथे येत पाहणी करतील. १०.४५ वाजता विकास भवन येथे स्वयंसेवी संस्था पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यानंतर ११.४५ वाजता विकास भवनातून खा. तडस यांच्या दादाजी धुनिवाले मठाजवळील निवासस्थानी जातील. येथून रवाना देवळी येथे जात विविध विकास कार्यक्रमाचे भूमिपूजन करतील. सायंकाळी ४ वाजता पवनारला येत पवनार आश्रमाला भेट देत नागपूरकडे प्रयाण करणार आहेत.(प्रतिनिधी)
मेनका गांधी बुधवारी वर्धेत
By admin | Updated: October 11, 2016 02:29 IST