शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा ब्लास्ट; 'उत्तम'च्या एका कामगाराची मालवली प्राणज्योत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 13:54 IST

Wardha news नजीकच्या भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत बुधवार ३ फेब्रुवारीला ब्लास्ट फरनेस विभागात झालेल्या अपघातात ३९ मजूर भाजल्या गेले. जखमी कामगारांत अभिषेक भौमिक याचाही समावेश होता. नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. रविवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास अभिषेकची प्राणज्योत मालवली.

ठळक मुद्दे बारा दिवसांपासून नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये देत होता मृत्यूशी झुंज

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : नजीकच्या भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत बुधवार ३ फेब्रुवारीला ब्लास्ट फरनेस विभागात झालेल्या अपघातात ३९ मजूर भाजल्या गेले. जखमी कामगारांत अभिषेक भौमिक याचाही समावेश होता. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. येथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास अभिषेकची प्राणज्योत मालवली.   अभिषेक भौमिक हा मुळचा पश्चिम बंगाल भागातील वर्धमान जिल्ह्यातील रहिवासी आहे. शटडाऊन आणि त्यानंतरच्या मेंटेनन्सच्या कामासाठी भुगाव येथील उत्तम गलवा कंपनी प्रशासनाने काही कुशल कामगारांना पाचारण केले होते. त्यात अभिषेकचाही समावेश होता. कर्तव्य बजावत असताना बुधवार ३ फेब्रुवारीला झालेल्या अपघातात अभिषेकही भाजल्या गेल्याची माहिती मिळाल्यावर अभिषेकचा भाऊ, काका व जावाई यांनी नागपूर येथील ऑरेंजसिटी हॉस्पिटल गाठल्याने तेही मागील काही दिवसांपासून नागपुरात आहेत. मागील १२ दिवसांपासून अभिषेक हा मृत्यूशी झुंज देत असताना रविवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या १७ कामगारांवर नागपूर येथील ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.अवघ्या काही दिवसांपासून आता होता वर्धेतभुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत मेंटेनन्सच्या कामासाठी काही कुशल कामगारांना कंपनी प्रशासनाने पाचारण केले होते. यात अभिषेक भौमिक याचा समावेश हाेता. घटनेच्या अवघ्या काही दिवसांपूर्वीच अभिषेक हा वर्धा शहरानजीकच्या भुगाव येथे आला होता, असे कंपनीतील सूत्रांनी सांगितले.अभिषेक भौमिक या कामागाराचा रविवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास नागपूर येथील ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचे कुटुंबीय रुग्णालयात मागील काही दिवसांपासून होतेच.   अभिषेक हा पश्चिम बंगाल भागातील वर्धमान जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचे पार्थिव त्याच्या मुळगावी नेण्यासाठी कंपनी प्रशासन त्याच्या कुटुंबीयांना नक्कीच मदत करेल.- आर. के. शर्मा, जनसंपर्क अधिकारी, उत्तम गलवा, स्टील कंपनी, भुगाव.

टॅग्स :Wardha Blastवर्धा स्फोट