शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
2
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
5
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
6
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
7
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
8
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
9
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
10
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
11
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
12
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
13
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
14
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
15
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
16
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
17
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
18
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
19
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
20
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका

सेवाग्राम ते वर्धा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी योग्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:06 IST

नजीकच्या वरूड वॉर्ड क्र. ५ मधील वर्धा ते सेवाग्राम मुख्य रस्त्याची दैना झाली आहे. रेल्वे स्टेशन वरूडला जोडणारा पेट्रोलपंप जवळील हा मुख्य रस्ता असून या रस्त्याने सतत वाहतूक सुरू असते. परंतु, रस्त्याची दैना झाल्याने वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या वरूड वॉर्ड क्र. ५ मधील वर्धा ते सेवाग्राम मुख्य रस्त्याची दैना झाली आहे. रेल्वे स्टेशन वरूडला जोडणारा पेट्रोलपंप जवळील हा मुख्य रस्ता असून या रस्त्याने सतत वाहतूक सुरू असते. परंतु, रस्त्याची दैना झाल्याने वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.याच रस्त्याने या भागातील वाहनचालक पेट्रोल, डिझेलचा वाहनात भरणा करण्यासाठी ये-जा करतात. शिवाय जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरात जाण्यासाठी ्रपेट्रोलपंपा जवळूनच दळण-वळणाची इतर साधने मिळत असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. परंतु, या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांसह वाहनचालकांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. रस्त्यावरील मोठाले दगड तुडवतच या मार्गाने ये-जा करावी लागत आहे. रस्त्याच्या दैनावस्थेमुळे बहूदा या मार्गाने ये-जा करणाऱ्यांची वाहने पंक्चर होतात. परिणामी नागरिकांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे खडी करण करण्यात आले होते. परंतु, अल्पवधीतच रस्त्यावरील मोठाले दगड बाहेर निघाल्याने व ते रात्रीच्या सुमारास सहज दिसत नसल्याने मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने त्याबाबतची तक्रार परिसरातील काही सुजान नागरिकांनी जिल्हा लोकशाही दिनात करीत सदर रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम