लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : २६ जानेवारी रोजी ग्रामसभेमध्ये स्पर्श अभियान राबविण्याबाबत जिल्हा समन्वय समितीच्या सभेचे आयोजन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आयोजित करण्यात आले होते.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा देश व जागतिक पातळीवर १५० व्या वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर २६ जानेवारी रोजी आयोजित ग्रामसभेमध्ये जिल्हाधिकारी यांचे घोषणापत्र सरपंच यांचे लिखित भाषणाचे वाचन तसेच सर्व उपस्थितांना प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. मी स्वत: व इतरांना सुद्धा कुष्ठरुग्णांना सोबत भेदभाव करणार नाही असा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याबाबतची माहिती आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ. लक्षदीप पारेकर यांनी दिली.ही मोहिम यशस्वी करण्याकरिता समाजातील सर्व घटकांचा सहभाग घेवून दडून असलेले सर्व नवीन कुष्ठरुग्ण शोधून काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सभेमध्ये दिल्या.शरीरावर लालसर किंवा फिक्कट रंगाचे बधीर चट्टे, त्वचा तेलकट किंवा चमकदार गुळगुळीत दिसणे, मज्जातंतू जाड व दुसऱ्या असे लक्षण आढळल्यास नजीकच्या सरकारी दवाखान्यामध्ये जावून तपासणी करून घेण्याबाबतचा संदेश सर्व जनतेपर्यंत सर्व आरोग्य कर्मचारी यांनी पोहोचविण्याबाबतच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी दिल्या. या कार्यक्रमाचे प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी कुष्ठरोग हा अनुवंशिक नसून हा जंतुमुळे होणारा एक सर्व साधारण असा आजार असून लवकर निदान व नियमित उपचाराने कुष्ठरोग हमखास बरा होतो अशी माहिती सभेत दिली. या सभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा साळवे, डॉ. प्रमोद बहूलेकर, आशा समन्वयक दिपाली चांडोळे तसेच कुष्ठरोग अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते. सदर मोहीम यशस्वी करण्याकरिता जिल्हा परिषद यंत्रणेने सर्व ग्रामसेवकांना सुचना द्याव्यात तसे अहवाल सादर करावे अशी सुचना यावेळी करण्यात आली.
कुष्ठरोग निर्मूलनासाठी स्पर्श अभियानांतर्गत प्रतिज्ञा घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 21:59 IST
२६ जानेवारी रोजी ग्रामसभेमध्ये स्पर्श अभियान राबविण्याबाबत जिल्हा समन्वय समितीच्या सभेचे आयोजन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आयोजित करण्यात आले होते.
कुष्ठरोग निर्मूलनासाठी स्पर्श अभियानांतर्गत प्रतिज्ञा घेणार
ठळक मुद्देप्रजासत्ताकदिनी ग्रामपंचायत घेणार ठराव : गांधी १५० अंतर्गत जिल्ह्यात राबविली जाणार मोहीम