शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीचे पंचनामे १० दिवसात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 22:05 IST

यंदाच्या खरीपात बी.टी. वाणावर बोंडअळीने आक्रमण केल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देमोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने होणार पडताळणी

आॅनलाईन लोकमतआर्वी : यंदाच्या खरीपात बी.टी. वाणावर बोंडअळीने आक्रमण केल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर महसूल व वनविभागाचे उपसचिव सु.ह. उमराणीकर यांनी आदेश काढून दहा दिवसात या बोंडअळीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.पंचनामे करण्याकरिता आवश्यक कालावधी कमी असल्याने फोटो जीपीएस मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने काढण्याचे आदेशात नमूद केले आहे. या पद्धतीने पंचनामे होणार असल्याने यात किती नुकसानग्रस्त शेतकरी पात्र ठरतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.कपाशीवरील बोंडअळीच्या हल्ल्याचा थेट परिणाम कपाशी उत्पादनावर झाला. यात झालेल्या नुकसानीची पडताळणी मोबाईल अ‍ॅपद्वारे करण्यात येणार असल्याने या संबंधीत विभागाच्या कर्मचाºयांना हा अ‍ॅप आधी त्यांच्या मोबाईलवर डाऊनलोड करावा लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद होणार आहे.यातही महसूल विभागाच्या सातबारात संबंधीत शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाची नोंद सातबारात असणे गरजेचे असल्याचे आदेशात नमूद आहे. यात सातबारे ‘अपडेट’ नसतील तर त्या शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई मिळणार अथवा नाही असा प्रश्न आहे. पंचनाम्यात नुकसानीची टक्केवारी ३३ च्यावर असने आवश्यक आहे. यात आर्वी उपविभागात तीनही तालुके ३३ टक्क्यांच्या वर असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशीवर नांगर फिरविल्याने त्यांचा सर्व्हे होणार कसा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेकांनी फिरविले नांगरबोंडअळीच्या हल्ल्यामुळे त्रस्त झालेल्या अनेक शेतकºयांनी त्यांच्या शेतातील कपाशीवर नांगर चालविला आहे. यामुळे या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आल्यास त्यांना याचा फायदा होईल अथवा नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.