शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘मैत्रेय’चा वर्धेकरांना १.७५ कोटींनी गंडा

By admin | Updated: May 21, 2017 01:00 IST

भविष्याची गुंतवणूक म्हणून अनेकांनी त्यांच्या घामाचा पैसा मैत्रये प्लॉटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या खासगी संस्थेत गुंतविला.

पोलिसांकडे क्विंटलभर तक्रारी : अनेकांच्या घामाचा पैसा अडकला महेश सायखेडे। लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : भविष्याची गुंतवणूक म्हणून अनेकांनी त्यांच्या घामाचा पैसा मैत्रये प्लॉटर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या खासगी संस्थेत गुंतविला. आपली ठेव दुप्पट होवून मिळेल या आशेत असतानाच सदर कंपनीने अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले. या कंपनीवर सेबीने बंदी आणल्याचे समोर येताच वर्धेतील गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळूच सरकली. या कंपनीत वर्धेकरांनी तब्बल १ कोटी ७५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे समोर आले. फसवणुकीचे प्रकार समोर येताच वर्धेतही तक्रारींचा ओघ सुरू झाला. आतापर्यंत तब्बल ८ हजार ३०० नागरिकांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्याची माहिती आहे. मैत्रेय या संस्थेने वर्धेत ३० हजार एजंटच्या माध्यमातून जिल्ह्यात जाळे पसरविले. अनेक आमिषे देत जिल्ह्यातील अनेक धनदांडग्यांसह सर्वसामान्य नागरिक मैत्रेयने आपले ग्राहक करून घेतले. यात वर्धेतील अनेक प्रतिष्ठीतांचा समावेश असल्याचे पोलिसांकडून दबक्या आवाजात सांगण्यात येत आहे. यामुळे आणखी तक्रारी आल्या नसल्याचेही बोलले जात आहे. आपल्या इभ्रतीपोटी झाले गेले गंगेला मिळाले, असे त्यांच्याकडून बोलले जात असल्याचे तपासात समोर येत आहे. सेबीने मैत्रेयच्या व्यवहारावर प्रतिबंध घातल्यानंतरही ग्राहकांकडून सदर कंपनीने वेगवेगळ्या योजनांमध्ये पैशाची गुंतवणूक केली. ही बाब लक्षात आल्यानंतर पिपरी (मेघे) येथील एका महिलेने रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली. फसवणुकीची रक्कम कोट्यवधीच्या घरात असल्याने प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वळता करण्यात आला. येथे आतापर्यंत क्विंटलभर वजनाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात गुंतविलेला पैसा नागरिकांना परत मिळावा यासाठी महाराष्ट्र ठेवीदार कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. साईनगरात कंपनीची ५९३ चौ.मी.ची मालमत्ता सेबीने बंदी घातल्यानंतरही ग्राहकांकडून विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून घेणाऱ्या मैत्रेय या कंपनीने ८ हजार ३०० ग्राहकांना १ कोटी ७५ लाखाने गंडा घातल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात उघड झाले आहे. मैत्रेय या कंपनीची वर्धेतील साईनगरात ५९३ चौरस मीटर जागेवर इमारत असून सदर मालमत्ता सील करण्याबाबत पोलिसांकडून अद्याप कुठलीही कार्यवाही केली नाही. किमान तसा प्रस्तावही सादर केला नसल्याची माहिती आहे. पहिली तक्रार महिला पोलीस कर्मचाऱ्याची पिपरी (मेघे) भागातील रहिवासी असलेल्या एका महिलेने मैत्रेय कंपनीबाबत सर्वप्रथम रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. सदर महिला दुसरी कुठली नसून पोलीस विभागात कार्यरत असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.