शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

मुख्य साक्षदाराला बयान बदलविण्याची धमकी

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात साक्षदारांचे बयान नोंदविण्यात आले आहे.

रूपेश मुळे नरबळी प्रकरण : शहर ठाण्यात गुन्हा दाखल वर्धा : जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात साक्षदारांचे बयान नोंदविण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षदार कालिदास राऊत याला या प्रकरणात साक्ष बदलविण्यासंदर्भात धमकी मिळाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. या प्रकरणी शहर ठाण्यात शनिवारी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूपेश मुळे नरबळी प्रकरणात साक्षदारांचे बयान नोंदविण्यात येत आहे. यात रूपेश याला शेवटचा पाहणारा साक्षदार म्हणून कालिदास राऊत याची शनिवारी साक्ष होती. साक्ष देण्याकरिता न्यायालयात येण्यापूर्वी त्याला शुक्रवारी सायंकाळी एका अज्ञात इसमाने भ्रमणध्वनीवर या प्रकरणातील साक्ष बदलविण्यासंदर्भात धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी कालिदास याने सकाळीच पोलीस ठाणे गाठत तशी तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम १९५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.साक्ष देण्याकरिता सकाळी कालिदास राऊत न्यायालयात हजर झाले असता त्यांनी न्यायाधीश अरविंद चांदेकर यांना प्रकाराची माहिती दिली. यावर न्यायाधीशांनी पोलिसांना कालिदास यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने कालिदास याची सरतपासणी केली. तर प्रकरणातील मुख्य आरोपी आसिफ खान याचे वकिल शहा यांनी प्रकरणात पुढची तारीख मिळण्याकरिता अर्ज सादर केला. यावर न्यायाधिशांनी त्यांना सोमवारची तारीख दिली. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार असल्याची माहिती शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. श्याम दुबे यांनी दिली.(प्रतिनिधी)कालिदास राऊत यांना संरक्षण देण्याचे आदेश प्रकरणातील मुख्य साक्षदार कालिदास राऊत याला धमकी देण्यात आल्याने शहर पोलिसांनी त्यांना सुरक्षा देण्याबाबतचे आदेश न्यायाधीश चांदेकर यांनी ठाणेदारांना दिले आहेत. त्यांच्याकडून तशी सुरक्षा पुरविण्यात येत आहे. धमकी देणारा ‘तो’ कोण ?रूपेश मुळे हत्या प्रकरणात साक्षदाराला धमकी दिल्याने या प्रकरणात आणखी कोणी सहभागी असल्याची शक्यता बळावली आहे. कालिदासच्या बयानात त्याचा उल्लेख होण्याची शक्यता असल्याने त्याला तशी धमकी देण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. यात धमकी देणाऱ्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.