शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजार शेतकºयांना महावितरणची संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 23:37 IST

शेतकऱ्यांना सिंचनाकरिता थ्री-फेजचा विद्युत पुरवठा केला जातो. शेतातील विहिरींवर, बोअरवर कृषी पंप लावून शेतकरी पिकांचे ओलित करतात. सध्याच्या स्थितीत अनेक आर्थिक अडचणी येत असल्याने शेतकºयांना वीज देयक अदा करणे शक्य नसते.

ठळक मुद्देजागृतीसाठी मेळावे : ६३,५९५ शेतकरी थकबाकीदार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना सिंचनाकरिता थ्री-फेजचा विद्युत पुरवठा केला जातो. शेतातील विहिरींवर, बोअरवर कृषी पंप लावून शेतकरी पिकांचे ओलित करतात. सध्याच्या स्थितीत अनेक आर्थिक अडचणी येत असल्याने शेतकºयांना वीज देयक अदा करणे शक्य नसते. परिणामी, शेतकरी महावितरणचे थकबाकीदार होतात. या शेतकऱ्यांकरिता महावितरणद्वारे कृषी संजीवनी योजना राबविली अयूप नोव्हेंबर २०१७ पर्यंत १४ हजार ७७६ शेतकºयांनी लाभ घेतला आहे.महावितरणकडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज पुरवठा उपलब्ध होतो. पिकांचे ओलित करताना कृषी पंप चालविले जात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या रकमेची देयके येतात. काही शेतकरी ही रक्कम प्रत्येक महिन्यात अदा करण्याची क्षमता ठेवतात तर काहींना ते शक्य होत नाही. परिणामी, ते वर्षानुवर्षे महावितरणचे देयक अदा करू शकत नाहीत. यामुळे त्यांच्यावर मोठ्या रकमा थकित राहतात. वर्धा जिल्ह्यात २०१७ पर्यंत तब्बल ६३ हजार ५९५ शेतकरी थकबाकीदार आहेत. या शेतकऱ्यांकडे महावितरणचे ९१ कोटी ९२ लाख रुपयांचे देयक थकलेले आहे. शेतकऱ्यांनी ही रक्कम अदा करावी म्हणून महावितरणकडून अनेक योजना राबविल्या जातात; पण पिकांची स्थिती पाहता ती रक्कम अदा करणे शक्य होत नाही. मग, ते शेतकरी इच्छा नसतानाही थकबाकीदार होतात. अशा शेतकऱ्यांकरिता महावितरणकडून कृषी संजीवनी योजना राबविली जाते. २०१७ मध्येही थकबाकीदार शेतकºयांकरिता ही योजना राबविण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत नोंदणी करणे गरजेचे होते. नोंदणी केल्यानंतर थकित देयकाच्या रकमेवरील व्याज माफ करून हप्ते पाडून दिले जातात. शिवाय या योजनेत सहभाग घेतल्यानंतर प्रत्येक तिमाहीत नियमित देयक आणि कृषी संजीवनी योजनेचे हप्ते भरणे अनिवार्य केले आहे.जिल्ह्यातील १४ हजार ७७६ शेतकºयांनी कृषी संजवनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून थकित असलेल्या देयकाच्या रकमेपोटी पहिला हप्ता म्हणून २ कोटी ३२ लाख रुपये महावितरणला प्राप्त झाले आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे म्हणून गावोगावी मेळावे घेण्यात आले. जागृतीसाठी वाहनांद्वारे ग्रामस्थांना माहितीही देण्यात आली. असे असले तरी सर्व शेतकरी या योजनेत सहभागी झाले नाही. आता सदर योजनेची मुदत वाढवून थकबाकीदार शेतकºयांना पुन्हा एक संधी देण्यासाठी प्रयत्न होत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.अखंडित वीज पुरवठ्यासाठी बिल भरणे गरजेचेकृषी पंपाकरिता वीज पुरवठा करताना शेतकऱ्यांना थ्री-फेजचा वीज पुरवठा द्यावा लागतो. यात शेतकºयांना अधिक देयक येत असल्याने ती रक्कम अदा करणे शेतकºयांकडून शक्य होत नाही. असे असले तरी अखंडित वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांना देयक अदा करणे गरजेचे आहे. यात कृषी संजीवनी योजना शेतकऱ्यांना मदतगार ठरत आहे; पण काहीच शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे उर्वरित थकित देयकांकरिता महावितरणला कठोर पावलेच उचलावी लागणार असल्याचे दिसते.शेतकºयांनी कृषी संजवनी योजनेचा लाभ घेत थकबाकी अदा करणे गरजेचे होते. या योजनेच्या माध्यमातून हे शक्य झाले असते. जिल्ह्यातील १४ हजार शेतकºयांनी योजनेत सहभाग घेत २.३२ कोटींची देयके अदा केली आहेत. ही योजना शेतकºयांच्याच फायद्यासाठी राबविण्यात आली.- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा.