शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती संदर्भातील 58 तक्रारी प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 05:00 IST

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ५८ हजार ८२६ शेतकऱ्यांची कर्ज खाते बँकांकडून अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी ५४ हजार ८४४ कर्जबाजारी शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर ५३ हजार ६७३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यावर ५२ हजार ७२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४६५.७७ कोटींची रक्कम वळती करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून त्याची अंमबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५२ हजार ७२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४६५.७७ कोटींची रक्कम वळती करण्यात आली असली, तरी अजूनही ५८ तक्रारी प्रलंबित आहेत.महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ५८ हजार ८२६ शेतकऱ्यांची कर्ज खाते बँकांकडून अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी ५४ हजार ८४४ कर्जबाजारी शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर ५३ हजार ६७३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यावर ५२ हजार ७२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४६५.७७ कोटींची रक्कम वळती करण्यात आली आहे. तर याच योजनेसंदर्भात २ हजार २०५ तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या. त्यापैकी २ हजार १४७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून सध्या स्थितीत ५८ तक्रारी प्रलंबित आहेत. यातील १३ तक्रारी जिल्हा पातळीवर, तर ४५ तक्रारी तालुकास्तरावर प्रलंबित आहेत. या तक्रारींचाही वेळीच निपटारा होणार असल्याचे सांगण्यात आले. एकूणच ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली आहे. 

३,९८२ शेतकऱ्यांचे काय?योजना जाहीर होताच जिल्ह्यातील ५८ हजार ८२६ शेतकऱ्यांचे कर्ज खाते बँकांनी अपलोड केले. त्यानंतर ५४,८४४ खाते योजनेचा लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले. आतापर्यंत आधारप्रमाणीत केलेल्या ५३,६७३ पैकी ५२ हजार ७२६ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला. पण बँकांनी अपलोड केलेल्या उर्वरित ३,९८२ शेतकऱ्यांचे पुढे काय? हा प्रश्न कायम आहे.

काय म्हणतात शेतकरी

युती सरकारच्या कर्जमाफी योजनेच्या तुलनेत महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली कर्जमुक्ती योजना पारदर्शी आहे. ही योजना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली आहे.- नंदराज वैद्य, शेतकरी.

शासनाने कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव दिला पाहिजे. कारण खत, बियाणे आदींचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा वेळी हमीभाव हा शेतकऱ्यांना दिलासाच देईल.- दिवाकर महाजन, शेतकरी.

२,२०५ शेतकऱ्यांच्या तक्रारी

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेशी संदर्भात जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या आतापर्यंत २ हजार २०५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी ८६८ तक्रारींचा निपटारा जिल्हा पातळीवर, तर १ हजार २७९ तक्रारींचा निपटारा तालुकास्तरावर करण्यात आला आहे.

५२,७२६ शेतकऱ्यांना मिळाले ४६५.७७ कोटी-    महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण केलेल्या ५२ हजार ७२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल ४६५.७७ कोटींची रक्कम वळती करण्यात आली आहे. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज