शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; सात उमेदवारांचे नामांकनपत्र रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

हिंगणघाट मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अतुल वांदिले यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. येथे १८ उमेदवार मैदानात राहिले आहेत. वर्धा विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. येथे बसपचे मोहन राईकवार, बळीराज पार्टीचे कैलास भोसे यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले आहे. येथे आता १० उमेदवार मैदानात आहेत.

ठळक मुद्देतीन मतदारसंघात प्रत्येकी दोन अर्ज बाद । हिंगणघाटात एक नामांकन रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात छाननीदरम्यान ७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हिंगणघाट मतदारसंघातील उमेदवार अतुल वांदिले यांच्यासह आर्वी, देवळी वर्धा मतदार संघातून प्रत्येकी दोन उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत. एकूण ५७ उमेदवारांचे अर्ज छाननीदरम्यान वैध ठरले आहेत.आर्वी मतदारसंघात एकूण १२ उमेदवारांनी नामांकनपत्र दाखल केले होते. छाननीदरम्यान बसपचे सुनील देशमुख व अपक्ष माधव देशमुख यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले. आर्वी मतदारसंघात आता १० उमेदवार रिंगणात आहेत. देवळी मतदार संघात २१ उमेदवारांचे नामांकन पत्र दाखल झाले होते. त्यापैकी २ उमेदवारांचे अर्ज छाननीदरम्यान रद्द झाले. यामध्ये जय महाभारत पार्टीचे सुनील पाटील व भाजपचे दिनेश किसना शिरभाते यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. आता येथे १९ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत.हिंगणघाट मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अतुल वांदिले यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. येथे १८ उमेदवार मैदानात राहिले आहेत. वर्धा विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. येथे बसपचे मोहन राईकवार, बळीराज पार्टीचे कैलास भोसे यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले आहे. येथे आता १० उमेदवार मैदानात आहेत. ७ ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची अखेरची दिनांक असून त्यानंतर मतदार संघातील लढती व उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. शनिवारी छाननी झाल्यानंतर रविवारी ६ ऑक्टोबरला सुटी आल्याने प्रशासनाकडे उमेदवारी अर्ज मागे घेता येणार नाही. त्यामुळे सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतरच राजकीय लढतीचे चित्र स्पष्ट होईल.मनसे उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने खळबळहिंगणघाट - हिंगणघाट विधानसभा मतदारसंघासाठी १८ उमेदवारांच्या नामांकन अर्जाच्या छाननीत मनसेचे उमेदवार अतुल वांदिले यांचा उमेदवारी अर्ज बाद होऊन १७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यापैकी मनसेचे उमेदवार अतुल वांदिले यांनी उमेदवारी अर्जासोबत नोटरी केलेले शपथपत्र सादर केले नाही. ही बाब निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या निदर्शनास आणून शनिवारी अर्जाच्या छाननीपूर्वी सादर करण्याची सूचना दिली होती. परंतु अर्जांच्या छाननीपर्यंत वांदिले यांनी नोटरी केलेले शपथपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज छाननीत रद्द ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी दिली. आता उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या १७ उमेदवारांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू तिमांडे, अपक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, बसपचे विलास नानाजी टेंभरे, संभाजी ब्रिगेडचे प्रशांत देशमुख, वंचित आघाडीचे डॉ. उमेश सोमाजी वावरे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे दमडू वारलू मडावी, लोकजागर पाटीर्चे मनीष पांडुरंग नांदे, अपक्ष मंदा रमेश ठवरे, श्याम इडपवार, मनीष भीमराव कांबळे, प्रशांत रामचंद्र पवार यांचा समावेश आहे. शनिवारी छाननीनंतर एकूण १७ उमेदवार मैदानात आहेत. सोमवारी, ७ ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल.सर्वाधिक उमेदवार देवळीतसर्वाधिक १९ उमेदवारी अर्ज देवळी मतदारसंघात छाननीनंतर शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे येथे सर्वाधिक उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता आहे. एका ईव्हीएम मशिनवर १६ उमेदवारांचे चिन्ह दिले जाऊ शकतात. उमेदवारांचा आकडा वाढल्यास दुसरी ईव्हीएम मशीन द्यावी लागेल. त्यामुळे छाननीनंतरच या बाबीचे नियोजन प्रशासन करेल. सद्यस्थितीत वर्धा व आर्वीत सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी १० तर देवळीत १९ व हिंगणघाटमध्ये १८ उमेदवार मैदानात आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, यावर्षी हिंगणघाट मतदारसंघात एका महिला उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.

टॅग्स :hinganghat-acहिंगणघाट