शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महादेवपुऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा ‘भाजीपाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

देशभरासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. विदर्भातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. भाजी बाजाराच्या पूर्वीच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने स्वावलंबी विद्यालयाचे मैदान आणि डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात भाजी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली.

ठळक मुद्देभाजी बाजारातील चित्र : जमावबंदी कायद्याचेही उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी शासन-प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंग अर्थात सामाजिक अंतर राखण्यासोबतच गर्दी टाळण्याचे वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, वर्धेकरांकडून नियम पायदळी तुडविले जात असल्याचे शुक्रवारी भाजी बाजारात दिसून आले.देशभरासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. विदर्भातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. भाजी बाजाराच्या पूर्वीच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने स्वावलंबी विद्यालयाचे मैदान आणि डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात भाजी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली. सोशल डिस्टन्सिंग राखण्याच्या अनुषंगाने भाजी विक्रीच्या दुकानासमोर चुन्याने आखणीही करण्यात आली. याला ग्राहकांनीही प्रतिसाद दिला. सद्यस्थितीत डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातील भाजी बाजार महादेवपुरा येथे हलविण्यात आला. तर स्वावलंबी मैदानावरील भाजी बाजार तेथेच आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी भरणाºया भाजी बाजारात प्रशासनाचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. शुक्रवारी महादेवपुºयातील भाजी बाजारात पदोपदी सोशल डिस्टन्सिंगची ऐसीतैशी होताना दिसली. रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने आणि नागरिकांच्या झालेल्या गर्दीमुळे जमावबंदी कायद्याचेही येथे सर्रास उल्लंघन होत होते. कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता नागरिकांनी स्वत: जागरूक असण्यासोबतच काळजी घेणे गरजेचे आहे. वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून न आल्याने नागरिक आपल्याला काही होत नाही, याच भ्रमात असल्याचे दिसून येते. इतर जिल्ह्यात नागरिकांनी दररोजच भाजी बाजारात गर्दी न करण्याचे आवाहन केले जात असून नागरिकही त्याला प्रतिसाद देत आहेत.वर्ध्यात मात्र, नागरिकांकडून रस्त्यांवर अनावश्यक फिरणे, मास्कचा वापर न करणे, गर्दी करणे आदी कृत्य करून प्रशासनाच्या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. कोरोनाला जिल्ह्यात प्रवेशबंदी करायची असेल तर नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे, असे सुज्ञ नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस