शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

कांचनपूर, वाही गावात महाश्रमदानाचे तुफान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:00 IST

जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेदरम्यान विविध सामाजिक संघटनांकडून महाश्रमदानाचे तुफान येत आहे. रविवारी आर्वी तालुक्यातील कांचनपूर आणि वाही या गावांमध्ये वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत श्रमदान केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी केला गावकऱ्यांसोबत वाढदिवस साजरा : वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेदरम्यान विविध सामाजिक संघटनांकडून महाश्रमदानाचे तुफान येत आहे. रविवारी आर्वी तालुक्यातील कांचनपूर आणि वाही या गावांमध्ये वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत श्रमदान केले.या श्रमदानात वैद्यकीय जनजागृती मंच, रेड क्रॉस सोसायटी, आर्वी, आदर्श कॉम्प्युटर क्लासेसच्या जवळपास ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कांचनपूरच्या सरपंच राजश्री धारगावे आणि ग्रामसेवक बोबडे तसेच सुमेध भस्मे यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व सामाजिक संघटनांनी मिळून अवघ्या तीन तासांमध्ये श्रमदानातून शेततळे तयार केले.यावेळी आदर्श कॉम्प्युटरच्या श्रुती पजई आणि आकांक्षा घोंगडे या विद्यार्थिनींनी गावकऱ्यांसोबत शेततळ्यातच वाढदिवस साजरा केला. वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ सचिन पावडे आणि सदस्यांनी रोपवाटिका तसेच इतर जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. गावातील नागरिकांनी पारंपरिक बासरी आणि डफ वाजवून आलेल्या श्रमदात्यांचे स्वागत केले. कामानंतर श्रमदात्यांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचण्याचा आनंद ही घेतला.वाही येथे राजू पावडे, गणेश गजकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय जनजागृती मंचाची चमू तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी, आर्वीच्या चमूने भेट देत जवळपास शंभर मीटर लांबीचा कांटूर बांध बनविला. गारपिटीच्या तडाख्याने उदध्वस्त झालेल्या या गावातील महिला पुरुष गावाजवळच्या टेकडीवर श्रमदान करताना दिसले. त्यांनी जवळपास सीसीपीचे काम पूर्ण केलेले होते. गावात जवळपास शंभर टक्के शोषखड्डे झालेले असून, रोपवाटिकेमध्ये १ हजार ५०० झाडांची लागवड झालेली आहे. गावात पाण्याचा दुष्काळ असतानाही हे गावकरी मात्र कुणावरही अवलंबून न राहता एकजुटीच्या ताकदीने दुष्काळाशी दोन हात करीत दररोज सकाळी श्रमदान करीत आहेत.यावेळी रेड क्रॉस सोसायटीचे डॉ. अरुण पावडे आणि त्यांचे सहकारी वैद्यकीय जनजागृती मंचाचे प्रभाकर राऊत, श्याम भेंडे, सचिन गरपाल, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, आशिष पड्डलवार, यांच्यासह सदस्य तथा आदर्श कॉम्प्युटरचे मंगेश दिवटे आणि विद्यार्थी, पुलगाव येथून आलेले प्रवीण लोखंडे, प्रवीण होनाडे, अजय अराटे आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.डोसकं फिरलं आता ह्या पाण्यासाठीतीनही गाव मिळून लोकसंख्या अंदाजे ६०० असली तरी त्यांचे बळ ६ हजार लोकांचे असल्याचे येथे झालेल्या कामावरून दिसून आले. गावात दुष्काळ असतानाही गावकऱ्यांकडून होत असलेल्या कामांकडे कधी पाठ झाली नसल्याचे येथील कामांवरून दिसून आले.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा