शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा मृत्युदर पोहोचला 2.40 टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 22:35 IST

आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात लम्पीची लागण झालेली एकूण ८३ जनावरे सापडली आहेत. त्यापैकी ज्या तालुक्यात लम्पीची लागण झालेली जनावरे सापडली त्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यांचा समावेश आहे, तर आर्वी तालुक्यात एका तर आष्टी तालुक्यात एका गोवंशाचा लम्पी चर्मरोगामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी लम्पी निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासनातील पशुसंवर्धन विभाग युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सन २०२० मध्ये एन्ट्री करून तब्बल १६ हजार ९०० जनावरांना मृत्यूच्या दाढेत नेऊ पाहणारा लम्पी चर्मरोग हा सध्या आपला आवाका वाढवू पाहत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत लम्पी चर्मरोगाची लागण झालेली तब्बल ८३ जनावरे आढळली असून, त्यापैकी दोन जनावरांचा मृत्यू झाला, तर १७ जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. एकूणच जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा मृत्युदर २.४० टक्के असून, तशी नोंदही पशुसंवर्धन विभागाने घेतली आहे. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात लम्पीची लागण झालेली एकूण ८३ जनावरे सापडली आहेत. त्यापैकी ज्या तालुक्यात लम्पीची लागण झालेली जनावरे सापडली त्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यांचा समावेश आहे, तर आर्वी तालुक्यात एका तर आष्टी तालुक्यात एका गोवंशाचा लम्पी चर्मरोगामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी लम्पी निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासनातील पशुसंवर्धन विभाग युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.

प्राप्त झाले प्रतिबंधात्मक लसीचे १.८५ लाख डोस-    लम्पी चर्मरोगाच्या प्रसाराला वेळीच ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध लागू केले आहेत. इतकेच नव्हे, तर पशुसंवर्धन विभाग युद्धपातळीवर विशेष प्रयत्नही करीत आहे. पशुसंवर्धनच्या प्रयत्नांना बळ देण्यासह लम्पी निर्मूलनासाठी लम्पी प्रतिबंधात्मक लसीचे १ लाख ८५ हजार डोस आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

नुकसानग्रस्त पशुपालकांना दिली आर्थिक मदत-    लम्पी चर्मरोगामुळे जनावर दगावलेल्या दोन्ही पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शासकीय नियमानुसार आर्थिक मदत देण्यात आली आहे, तर उपचाराखाली असलेल्या प्रत्येक लम्पीबाधित जनावरावर पशुसंवर्धन विभागाचा वॉच आहे.

१.७२ लाख जनावरांना दिली प्रतिबंधात्मक लस-    लम्पी चर्मरोगाला ब्रेक लावण्यासाठी गोट पॉक्स ही लस उपयुक्तच आहे. ज्या भागात लम्पी बाधित जनावर सापडले त्या भागातील जनावरांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. आतापर्यंत १ लाख ७२ हजार ३५४ गोवंशांना गोट पॉक्स ही लस देण्यात आली आहे. तशी नोंद पशुसंवर्धन विभागाने घेतली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात लम्पीबाधित एकूण ८३ जनावरे सापडली आहेत. त्यापैकी दोन जनावरांचा मृत्यू झाला, तर १७ जनावरे लम्पीमुक्त झाली असून, ६४ जनावरांवर उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत १ लाख ७२ हजार ३५४ गोवंशांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.- डॉ. राजेश वासनिक, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद.वर्धा.

 

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग