शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

निम्न वर्धा प्रकल्पाची वाट खडतर

By admin | Updated: August 1, 2016 00:36 IST

गत काही वर्षांपासून पर्यटन विकासाकरिता खोऱ्याने पैसा येत आहे. तो खर्चही केला जाताना दिसतो; ....

रस्त्यावर केवळ चिखल आणि डबके : सार्वजनिक बांधकामसह प्रकल्प विभागाचाही कानाडोळा वर्धा : गत काही वर्षांपासून पर्यटन विकासाकरिता खोऱ्याने पैसा येत आहे. तो खर्चही केला जाताना दिसतो; पण पर्यटन स्थळांचा विकास झपाट्याने होताना दिसतच नाही. जिल्ह्यातील प्रकल्पही पर्यटनस्थळापेक्षा कमी नाहीत. असे असताना त्या प्रकल्पांकडे जाणाऱ्या मार्गांची अत्यंत दयनिय अवस्था असल्याचे निम्न वर्धा प्रकल्पाला दिलेल्या भेटीत दिसून आले. निम्न वर्धा प्रकल्पाची वाट सामान्य पर्यटक, नागरिकांकरिता अत्यंत खडतर झाल्याचेच दिसून आले. केवळ खड्डे, डबके आणि चिखलाचे साम्राज्यच दिसून आले. मग, धरणापर्यंत पोहोचणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. पुलगाव ते आर्वी मार्गावरील आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे वर्धा नदीवर निम्न वर्धा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. तब्बल २०-२२ वर्षांनी मूर्त रूपात आलेल्या या प्रकल्पाबाबत नागरिकांत बरीच उत्सुकता होती. या प्रकल्पाला ‘वरूड बगाजी सागर’ असे नावही देण्यात आले; पण तेथील परिसर विकासाकरिता अद्याप कुठलीही पावले उचलण्यात आली नाही. २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटला असताना प्रकल्प पूर्ण झालेला नाही. कालव्याची कामे अद्यापही बाकी आहेत. प्रकल्पातून निघालेल्या मुख्य डाव्या कालव्याचे अद्याप अस्तरीकरणही करण्यात आलेले नाही. पूढे काही भागात कालव्याचे काम पूर्ण झाले; पण त्यातही गैरप्रकार झाल्याच्याच तक्रारी पूढे येत आहे. किमान प्रकल्पाने मूर्त रूप घेतल्यानंतर परिसर विकासाकडे लक्ष देत पर्यटक, नागरिकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करता आले असते; पण तसे झाले नाही. प्रकल्प आणि कालव्यांच्या कामांत रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम तसेच पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षच करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी सुस्थितीत असलेल्या आर्वी रोड ते मंगरूळ (दस्तगीर) या रस्त्यावर आज केवळ चिखलाचेच साम्राज्य आहे. जागोजागी खड्डे असल्याने वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागते. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी) पुलावरचे सिमेंटही गेले वाहून निम्न वर्धा प्रकल्पाच्या समोरून गेलेल्या रस्त्यावर वर्धा नदीवर जुना पूल आहे. प्रकल्पानंतरही आर्वी रोड ते मंगरूळ हा रस्ता बंद होऊ नये म्हणून तो पूल जैसे थे ठेवण्यात आला आहे; पण त्या पुलाची अद्याप उंचीही वाढविण्यात आली नाही की डागडुजीही करण्यात आलेली नाही. परिणामी, प्रकल्पाची दारे उघडल्यानंतर वाहणाऱ्या पाण्यामुळे पुलावरील सिमेंट वाहून गेले आहे. पुलावर अनेक ठिकाणी सिमेंटची परत वाहून गेल्याने खड्डे पडले आहेत. या पुलावर कठडे लावणे गरजेचे असताना त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. परिणामी, पुलावर थोडेही पाणी असले की, सदर मार्गावरील रहदारी पूर्णत: ठप्प होते. यामुळे सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देत सदर पुलाची उंची वाढविणे आणि रस्ता दुरूस्ती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.