शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

साहेब! धान्य देत आहात तर खाण्यायोग्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 15:39 IST

मागील काही महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानातून एपीएल, बीपीएल आणि सामान्य केशरी कार्डधारकांना वाटप करण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असून साधे खाण्यायोग्यही नसल्याची ओरड होत आहे.

ठळक मुद्देलाभार्थ्यांची ओरड : निकृष्ट पुरवठा होत असल्याचे तहसीलदारांना निवेदन

वर्धा : सिंदी (रेल्वे) शहरातील स्वस्त धान्य दुकानातून एपीएल, बीपीएल आणि सामान्य केशरी कार्डधारकांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याने लाभार्त्यांनी असंतोष व्यक्त केला आहे. अनेक लाभार्थ्यांकडून साहेब धान्य देत आहात तर खाण्यायोग्य द्या, अशी ओरड होत आहे. याबाबत नागरिकांनी प्रभारी तहसीलदार नितीन गौर यांच्याकडे निवेदन देऊन चांगल्या धान्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

शहरात धान्य पुरवठा विभागाच्या गोदामातून सेलू तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांना धान्याचा पुरवठा केला जातो. गोदामातील धान्य पूर्णपणे सुरक्षित असतो, तरीदेखील मागील काही महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानातून एपीएल, बीपीएल आणि सामान्य केशरी कार्डधारकांना वाटप करण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असून साधे खाण्यायोग्यही नसल्याची ओरड होत आहे. गोदामात साठवणूक केलेले धान्य निकृष्ट कसे होते, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याची दखल घेत शहरातील काही नागरिकांनी प्रभारी तहसीलदार नितीन गौर यांची भेट घेत, गोरगरिबांना मिळणारा निकृष्ट धान्य पुरवठा तत्काळ थांबवा, या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांनी निवेदनातून केली.

निवेदन देताना सिंदी शहर मित्र परिवार ग्रुपचे तानाजी झाडे, बाबा भुते, गजानन खंडाळे, रवी वाघमारे, अजय कलोडे, रवी राणा, आफताब क्युरेशी, दत्ता कटाईत यांची उपस्थिती होती.

टॅग्स :foodअन्नSocialसामाजिक