शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ऐन मुहूर्तावर नवरीला घेऊन प्रियकर पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:04 IST

ऐन लग्नाच्या मुहूर्तावर प्रियकर नवरीला घेवून पळाल्याची घटना सोमवारी आर्वी येथे घडली.

ठळक मुद्देगुरुनानक मंगल कार्यालयासमोरुन वऱ्हाड्यांसमक्ष फिल्मी स्टाईलने काढला पळ

आॅनलाईन लोकमतआर्वी : ऐन लग्नाच्या मुहूर्तावर प्रियकर नवरीला घेवून पळाल्याची घटना सोमवारी आर्वी येथे घडली. प्रकरण पोलिसात पोहोचले पण नवरीचा पत्ता मात्र लागला नाही. कधी हिंदी चित्रपटात साजरा वाटणारा हा सीन आर्वीकरांनी अनुभवला.सदर नवरीन यवतमाळ येथील असून नातलगांनी तिचे लग्न आर्वी येथील मावशीच्या घरून करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार सकाळी ११ वाजताच्या सुमारास मावशीच्या घरून मंगल कार्यालयात आपल्या मैत्रीण व तीन नातेवाईकांसोबत कारमध्ये निघाली. ती मंगलकार्यालयात पोहोचली. येथे तिच्या मैत्रिणी आणि नातलग खाली उतरले. नवरी मुलगी खाली उतरेल असे वाटत असतानाच चालकाने कार सुरू करून पोबारा केला. प्रत्येकाचा संशय कारचालकावर जात असताना कार घेवून पळालेला तिचा प्रियकरच असल्याचे समोर आले.आर्वी येथील गजानन पुरुषोत्तम कळसकार रा. हनुमान वॉर्ड याचे यवतमाळ येथील मुलीसोबत पारंपारिक रितीरिवाजा प्रमाणे लग्न ठरले. त्यानंतर मुला-मुलींचे धुमधडाक्यात साक्षगंधही झाले. आणि काही दिवसातच म्हणजे आज ४ डिसेंबर २०१७ ला ११.२५ मुहूर्तावर आर्वीतील गुरुनानक मंगल कार्यालयात लग्नाचा बार उडणार होता. ठरल्याप्रमाणे वर-वधु कडील दोन्ही पक्षांनी तयारी केली. वधु-वरांचे सर्व नातेवाईक व आप्त परिवार गुरुनानक मंगल कार्यालय येथे एकत्रित झाले. कालच वधुकडील वऱ्हाडी आर्वीत दाखल झाले. नवरी मावशीकडून लग्नाच्या वेळेवर मंगल कार्यालयात येण्याकरिता आपल्या मैत्रीण व तीन महिला नातेवाईकांसोबत निघाली. मंगल कार्यालयासमोर पोहचताच नातेवाईक व मैत्रीणी खाली उतरताच कार चालकाने नवरीला घेऊन तेथून पळ काढला.काही वेळानंतर सदर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर तो कार चालक नसून नवरीचा प्रियकर असल्याचे उघडकीस झाले. वृत्त लिहेपर्यंत नवरीच्या शोधात निघालेल्या पोलीस पथकाला तिचा शोध लावणे शक्य झाले नसल्याचे सांगण्यात आले. वराकडील मंडळी वधुच्या नातलगांना झालेला दोन लाखांचा खर्च द्यावा अशी मागणी पोलिसांसमोर करीत आहे. तर पोलीस वराकडील मंडळीना पहिले वधुचा शोध लागु द्या नंतर काय करायचे आहे ते ठरवा. असे वर-वधु कडील मंडळीना समजवण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्या गाडीने वधुला तिच्या प्रियकराने पळुन नेले त्या गाडीचा क्रमांक एमएच २९ एआर १२३७ असा आहे. तर लग्नाच्या पाहुण्यांकरिता बनवलेला स्वयंपाक जसाचा तसाच असल्याची माहिती वर-वधुकडील मंडळींनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकरावर भादंविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला. चौकशीनंतरच या प्रकरणी कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले यांनी दिली.तयारीवर फेरले पाणीसाक्षगंध झाल्यानंतर लग्नाचा मुहूर्त ठरला. या काळात वधू आणि वरपक्षाच्यावतीने सर्वच तयारी केली. मंगल कार्यालय, जेवणावळी, पाहुण्यांचा अहेर, नातलगांना आमंत्रण आदि सर्व तयारी करण्यात आली. मात्र ऐन वेळी नवरीला घेवून प्रियकर पसार झाल्याने कुटुंबीयांनी केलेल्या सर्वच तयारीवर पाणी फेरल्या गेल्याची चर्चा लग्नमंडपात होती.