शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांनी केले कपाशीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:41 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्वीच शेतकरी मेटाकुटीस आला असून आता वन्यप्राणीही शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. डोळ्यात तेल टाकून रात्ररात्र शेतकरी शेतात जागून उभ्या पिकाचे संरक्षण करीत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देपाच एकरातील पीक तुडविल्याने शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्वीच शेतकरी मेटाकुटीस आला असून आता वन्यप्राणीही शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. डोळ्यात तेल टाकून रात्ररात्र शेतकरी शेतात जागून उभ्या पिकाचे संरक्षण करीत असल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमिवर रानडुक्कराच्या कळपाने खरांगणा (मो.) नजीकच्या दहेगाव (गोंडी) शिवारात पाच एकरातील कपाशी पिकाचे नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वन विभागाने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.आर्वी तालुक्याच्या खरांगणा (मोरांगणा) येथील शेतकरी कीर्तीपाल, पुरुषोत्तम आणि दादारावजी चाफले यांच्या नावे खरांगणा (मोरांगणा) आणि दहेगाव (गोंडी) शिवारात शेती आहे. शेती हेच त्यांच्या उपजिवीकेचे मुख्य साधन आहे. त्या शेतीत चाफले यांनी कपाशीची लागवड केली. पिकाची योग्य निगा घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. परिणामी, मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भरघोस उत्पन्न होईल अशी आशा असताना चाफले यांच्या शेतात रानडुकराच्या कळपाने घुसून उभ्या कपाशी पिकाची नासडी केली. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.वन्यप्राण्यांचा बंदोबस्त कराआधीच शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे. कधी शेतात पाणी साचून तर कधी पाण्याने दडी मारल्याने नुकसान होते. या भागातही नित्याचाच असा प्रकार घडतो. रानडुकरांचा या भागात सातत्याने धुमाकुळ आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागात असलेल्या वन्य प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती