शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:38 IST

जैन धर्माचे २४ वे तीर्र्थंकर भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव शहरातील सकल जैन समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा व भगवान महावीर रथाची शोभायात्रा काढून साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देभव्य शोभायात्रा : चित्ररथाचे अनेक संस्थांतर्फे पूजन व प्रसाद वितरण

ऑनलाईन लोकमतपुलगाव : जैन धर्माचे २४ वे तीर्र्थंकर भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव शहरातील सकल जैन समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा व भगवान महावीर रथाची शोभायात्रा काढून साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना दूध वाटप करण्यात आले.सकाळी ७.३० वाजता खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरातून भगवान महावीर स्वामींची प्रतिमा विराजीत सुशोभित रथयात्रा निघाली. जैन संस्कार पाठशाळेतर्फे हरित क्रांतीचा संदेश देणारे बालगोपाल, महावीर स्वामींना दंश करणारा चंद्रकौशिक नाग, महावीर स्वामींच्या कोनाला खिळ ठोकणारा गुराखी व भगवान तथा अष्ट प्रतिहार आदी दृष्य साकारलेले चित्ररथ, रथावर विराजीत इंद्र-इंद्रायणीच्या भूमिकेत रश्मी व राजेश पाटणी, श्वेतवस्त्र धारक श्रावक व केसरी वस्त्रधारक श्राविका समावेशित शोभायात्रा लक्ष वेधत होती. जैन श्रावकांद्वारे रथाचे ठिकठिकाणी पूजन करण्यात आले. शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख प्रशांत शहागडकर, ओंकार धांदे, दिनेश खेडकर, विनोद बाभुळकर यांनी, न.प. तर्फे नगराध्यक्ष शीतल गाते, उपाध्यक्ष आशिष गांधी, गटनेते राजीव जयस्वाल यांनी, श्री संकट मोचन देवस्थानतर्फे गिरीष चौधरी, सावरिया मारोठिया यांनी, भाजपतर्फे शहराध्यक्ष मंगेश झाडे, संजय गाते, नितीन बडगे, सुरेश सुखिजा, श्रवण तिवारी, मधुकर रेवतकर, देविदास डाहे यांनी रथाचे पूजन केले. सकल जैन समाजातील ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. केतुल, अतुल पडधारियातर्फे मिठाईचे पॅकेट तर श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघाने रथाचे स्वागत करून गरबा सादर केला. पासड परिवाराने शीतपेय वितरित केले. भारतीय जैन संघटनेतर्फे सुभाष झांझरी, चंद्रकांत शहाकार व पदाधिकाऱ्यांनी रुग्णांना दूध वितरित केले. सावळकर परिवारातर्फे फलाहार देण्यात आला. झांझरी परिवाराने दूध तर शहर, महिला व युवक काँग्रेसतर्फे रमेश सावरकर, रंजना पवार, पद्मा लुंकड, गोविंद दैय्या यांनी शीतपेय वाटप केले. स्थानकवासी श्रावक संघातर्फे प्रा. प्रकाशचंद श्रीश्रीमाळ, प्रफुल दर्डा, कांतीलाल लुंकड, प्रमोद लुंकड, गौतम लुंकड, मनोज सोनी, अनिल नाहटा व परिवारांनी रथाचे पूजन करून प्रसाद वितरण केले. खंडेलवाल, दिंगबर जैन मंदिर येथे महाप्रसादाने सांगता झाली.रथयात्रेमध्ये रमेश पाटणी, किशोर बदनोरे, सुधीर बदनोरे, महावीर लुंकड, गौतम लुंकड, वसंत कुकेकर, विरेंद्र धोपाडे, पंकज श्रीश्रीमाळ, प्रभाकर शहाकार यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Mahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८