शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ-नागपूर पॅसेंजरमध्ये लुटमार

By admin | Updated: January 28, 2017 01:03 IST

मालखेड-तळणी रेल्वे स्थानकादरम्यान भूसावळ-नागपूर पॅसेंजरमधील प्रवाशांना पाच ते सहा तरुणांनी शस्त्राचा

दोघांना अटक, तीन फरार : लोहमार्ग पोलिसांची कारवाई वर्धा : मालखेड-तळणी रेल्वे स्थानकादरम्यान भूसावळ-नागपूर पॅसेंजरमधील प्रवाशांना पाच ते सहा तरुणांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले. याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास चक्र फिरवुन दोघांना अटक केली तर तिघे अद्यापही फरार आहेत. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. आकाश सुरेश बर्वे (२१) रा. दत्त कॉलनी अकोला, व डोमनिक मैनफ्रेंड कोफ (१९) या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांना सहकार्य करणाऱ्या अन्य आरोपींचीही ओळख पटली असून ते फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. पोलीस सुत्रानुसार, मालखेड-तळणी रेल्वे स्थानकादरम्यान भूसावळ-नागपूर या धावत्या पॅसेंजर गाडीत प्रवाशांना शस्त्रांच्या धाकावर लुटले. सदर रेल्वे प्रवाशांनी पुलगाव रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवल्याची माहिती वर्धेच्या लोहमार्ग पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी तपासाची चके्र फिरविली. आरोपींचे वर्णन मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या सहकाऱ्यांचा तपास सुरू आहे. प्रवाशांनी तळणीत रोखली रेल्वे ४धावत्या रेल्वे गाडीत होत असलेल्या लुटमारीची माहिती गाडीतील प्रवाशांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत प्रवाशांनी सदर रेल्वे तळणी रेल्वे स्थानकावर रोखून धरली. मात्र आरोपींनी रेल्वेतून उडी घेवून पळ काढला. मात्र लुटमार करणाऱ्यांची ओळख पोलिसांना मिळताच त्यांना ताब्यात घेतले.