शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अल्प पर्जन्यमानातही लागवडीने व्यापले दीर्घ शिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 05:00 IST

आठही तालुक्यांमध्ये ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु मान्सून अद्याप धडकला नसल्याने जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी २२ जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण १ हजार ३९२.९४ मि.मी. तर सरासरी १७४.१२ मि.मी. पावसाची नोंद केली होती. एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत २०.८८ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनीही पेरणीला गती दिली होती.

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मान्सून सुरु होऊन दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरीही जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले नाही. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५१५.२७ मिलीमीटरच पाऊस पडला असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. अल्पपर्जन्यमान असतानाही कृषी विभागाकडून जिल्ह्यात ४२ हजार ६९४ हेक्टरवर म्हणजेच एकूण नियोजनाच्या १० टक्के पेरण्या झाल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष परिस्थिती निराळी असून जिल्ह्यात सध्या तरी ५० टक्केच्या आसपास पेरण्या आटोपल्या आहे. पावसाचाही पत्ता नसल्याने या शेतकऱ्यांवर दुबारी पेरणीचे संकट ओढविण्याची दाट शक्यता आहे.आठही तालुक्यांमध्ये ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु मान्सून अद्याप धडकला नसल्याने जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी २२ जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण १ हजार ३९२.९४ मि.मी. तर सरासरी १७४.१२ मि.मी. पावसाची नोंद केली होती. एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत २०.८८ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनीही पेरणीला गती दिली होती. परंतु यावर्षी केवळ ७.७२ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ५१५.२७ मिलीमीटर तर सरासरी ६४.४१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. अजूनही सर्वदूर माॅन्सून बरसला नसतानाही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. यामध्ये कपाशीची लागवड सर्वाधिक असून आता आकाशाकडे नजरा लागल्या आहे.

कृषी विभागाच्या आवाहनाला शेतकऱ्यांचा खो...- या वर्षी पावसाने चांगलाच विलंब केल्याने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करण्यात आले आहे. सरासरी १०० मि.मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय लागवड करु नका, असे सांगण्यात येत आहे. तरीही शेतकऱ्यांनी या आवाहनाला खो देत लागवड केल्याने कृषी विभागही वैतागला आहे. आता शेतकऱ्यांना पेरणीपासून थांबविण्याकरिता कृषी विभागातील अधिकारी बांधावर जाणार असल्याचे सांगत आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती