वर्धा : प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदाराला अवगत करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी संबंधीतांना दिल्या. बुधवारी लोकशाही दिनी एकून १६ तक्रारी दाखल झाल्या. त्यातील ४ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. उर्वरित तक्रारी संबंधित विभागांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीसंदर्भात जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी संपूर्ण माहिती घेतली. तसेच संबंधित विभागप्रमुखांना दोन आठवड्यात तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीबाबत कळविण्यात यावे, असे निर्देशही दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अधीक्षक अभियंता देशपांडे, कार्यकारी अभियंता शरद चौधरी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, जिल्हा ग्रंथपाल अस्मिता मंडपे उपस्थित होते. लोकशाही दिनामध्ये ग्रामपंचायत, पोलीस, भूमी अभिलेख, मोजणी, अतिक्रमण, ले-आऊट, वीज आदी विषयांवर तक्रारी दाखल झाल्या होत्या.(शहर प्रतिनिधी)
लोकशाहीदिनी १६ तक्रारी दाखल
By admin | Updated: December 10, 2015 02:18 IST