शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Lok Sabha Election 2019; रणरणत उन्ह; कार्यकर्त्यांनी घ्यावी काळजी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 21:38 IST

वर्धा लोकसभा मतदार संघात रणसंग्राम तापत असताना सूर्यही आग ओकायला लागला आहे. तरी सर्व मतदारांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचण्याकरिता नेत्यांसह कार्यकर्ते दिवसरात्र पळत आहे. सध्यात वर्ध्यातील तापमान चाळीशीपार गेल्याने येत्या दिवसात ते आणखीच वाढण्याची आहे.

ठळक मुद्देसूर्य आग ओकतोय अन् प्रचाराचा पाराही चढलाय : डॉक्टरांचा सल्ला : पाणी प्या, बाहेरचे खाणे टाळा

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघात रणसंग्राम तापत असताना सूर्यही आग ओकायला लागला आहे. तरी सर्व मतदारांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचण्याकरिता नेत्यांसह कार्यकर्ते दिवसरात्र पळत आहे. सध्यात वर्ध्यातील तापमान चाळीशीपार गेल्याने येत्या दिवसात ते आणखीच वाढण्याची आहे. त्यामुळे प्रचारासोबतच आता उमेदवारांसह कार्यकर्त्यांना प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे.वर्धा लोकसभा मतदार संघात वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील धामणगांव (रेल्वे) व मोर्शी अशा सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. लोकसभा क्षेत्राचा तब्बल ६ हजार ३२३ चौरस किलोमीटर इतक आवाका आहे. तसेच २३४ किलोमीटरच्या परिघात हा मतदार संघ येत असून यामध्ये यावर्षीच्या मतदार नोंदणीनुसार १७ लाख ४२ हजार ४५० मतदार आहे.निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांचे तीन, नोंदणीकृत राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांचे सात तर अपक्ष म्हणून चार उमेदवार रिंगणात आहे. येत्या ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून उमेदवारांना प्रचाराकरिता केवळ १२ दिवसांचा कालावधी मिळाल्याने उमेदवारांनी प्रचार यंत्रणा सक्रीय केल्याचे दिसते. कार्यकर्तेही कामाला लागले आहे. या दरम्यान नेत्यांच्या सभाही होत आहेत. आता केवळ पाच दिवस प्रचारासाठी शिल्लक राहिल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी तपत्या उन्हाची तमा न बाळगता आपला उमेदवार इतर उमेदवारांच्या तुलनेत कसा वेगळा आहे, हे पटवून देताना दिसत आहेत.सोबतच सूर्याचा पाराही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी या तापत्या उन्हापासून आपल्या प्रकृतीचाही बचाव करण्याची गरज आहे. प्रकृती जर सांभाळली नाही तर येत्या दिवसात उमेदवारांना सूर्यनारायणाच्या कोपालाही समोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काळजी घेतलेली बरी.तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यताविदर्भातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील उष्णतेची ही लाट तीव्र होऊन ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे.तसेच याच दिवसांमध्ये गारपीटाचीही शक्यता वर्तविण्यात आली असून वातावरणातील बदलाचा परिणाम प्रचारावरही पडण्याची शक्यता आहे. होणाऱ्या प्रचारसभा, गावागावातील प्रचार यावरच उष्णेतेसह गारपीटाचाही परिणाम जाणविण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळाच्या झळाही सासाव्या लागत आहेत.हे कराल तर वाचाल?1. पुरेसे पाणी घ्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा, हलक्या वजनाचे फिक्कट रंगाचे सैल कपडे वापरा, उन्हात गॉगल, छत्री व पादत्राणे वापरा,उन्हा जाताना टोपी/ हॅट खाली ओलसर कपडा ठेवा.2. घराला ओलसर पडदे,पंखा, कूलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा, पहाटेच्यावेळी आणि सायंकाळी जास्तीत जास्त प्रचार कामे आटोपावी, दुपारी घराबाहेर पडणे टाळावे,3. प्रचाराला जात असताना उन्हात कष्टाची कामे करणे टाळावी, पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठे ऊ नये, मद्य, चहा, कॉफी व सॉप्ट ड्रिंक्स टाळा, खुप प्रथिन युक्त अन्न आणि शिळे अन्न खाणे टाळा.

टॅग्स :TemperatureतापमानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक