शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

Lok Sabha Election 2019; राहुल गांधी यांच्या सभेत काँग्रेस उमेदवाराचे भाषण कुणी रोखले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 20:20 IST

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्ध्यात आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. मात्र, या सभेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अ‍ॅड.चारूलता टोकस यांनी संबोधित केले नाही.

ठळक मुद्देसभेला उपस्थित महिलांची निराशापदाधिकारी, कार्यकर्त्यांत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्ध्यात आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. मात्र, या सभेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अ‍ॅड.चारूलता टोकस यांनी संबोधित केले नाही. चारूलता टोकस यांना जाहीर सभेत भाषण देण्यास काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी रोखले, याची मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे. या सभेला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. राहुल गांधींनीही महिलांच्या उपस्थितीबाबत आपल्या भाषणात उल्लेख केला. परंतु, काँग्रेसच्या उमेदवार महिला असूनही या जाहीर सभेत त्या एक शब्दही न बोलल्याने महिलांचा हिरमोड झाला. या कसल्या शिक्षित उमेदवार, अशी प्रतिक्रिया या सभेतून परतणाऱ्या अनेक महिलांनी लोकमत प्रतिनिधीजवळ व्यक्त केली. चारूलता टोकस या गुडगाव (हरियाणा) येथे १९९१ पासून राहतात. संपूर्ण कुटुंब येथे स्थायिक झाले आहे. त्यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रातही गुडगाव, मुंबई येथील बंगल्यांचा उल्लेख केला आहे. मात्र, कोल्हापूर (राव) या गावात शेती असल्याचे नमूद करीत येथील पत्ता त्यांनी दिला आहे. उमेदवार बाहेरचा असल्याने आधीच मतदारसंघात काँग्रेसला प्रचारात कमालीची अडचण जात आहे. त्यामुळे माहेरकडील जातीचा आधार घेत कार्यकर्ते प्रचारात आहेत. मात्र, उमेदवार राहतो कुठे, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस नेत्यांना अजूनही देता आलेले नाही. राहुल गांधींच्या जाहीर सभेत काँग्रेसचे नेते मतदारांना याचे उत्तर देतील, अशी अपेक्षा होती. स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये आमदार अमर काळे यांना भाषणाची संधी पक्षाकडून देण्यात आली. त्यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली. उमेदवाराच्या वास्तव्याबाबत त्यांनीही चकार शब्द काढला नाही. उमेदवार स्वत: जाहीर सभेला मार्गदर्शन करीत असतो, त्याशिवाय निवडणुकीची सभा होऊच शकत नाही. मात्र, उमेदवाराने जाहीर सभेला संबोधित न केलेली भारताच्या निवडणूक इतिहासातील ही पहिलीच जाहीर सभा असावी, असा आता प्रचार होऊ लागला आहे.

रणजित कांबळेंकडून दुखावलेले एकवटलेप्रभाराव यांच्यानंतर मागील १५ वर्षांपासून रणजित कांबळे यांच्याकडे अबाधित सत्ता आली. जिल्हा काँग्रेस कमिटीवर वर्चस्व प्रस्थापित केले. कांबळे यांनी जिल्ह्यातील सहकार गटाची वाताहात करून टाकली. ज्येष्ठ सहकार नेते व शिक्षण महर्षी बापूरावजी देशमुख यांनी जपलेली शेकडो माणसे या सहकार क्षेत्रात कार्यरत होती. सहकार गटाचा दबदबा संपविण्याचे काम गेल्या १५ वर्षांपासून रणजित कांबळे व त्यांचे समर्थक इमाने-इतबारे करीत आहे. आता त्यांचा हिशेब लावण्याची वेळ आली आहे, अशी भावना सहकार क्षेत्रातील अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याचाच राग युवा नेते समीर देशमुख यांना असल्याने त्यांनी प्रचारातून पूर्णपणे माघार घेतली आहे. समीर देशमुखांचे खंदे समर्थक असलेले सुधीर पांगूळ यांनाही सहकार गटापासून तोडण्याचे काम कांबळे यांनीच केले, याची जाणीव या गटातील कार्यकर्त्यांना आहे. त्याचा सर्व हिशेब गोळा-बेरजेसह घेण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019