शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; १७.४२ लाख मतदार बजावणार आज हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 21:57 IST

निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होय. ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून गुरूवार ११ एप्रिलला पार पडणार आहे. वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण १७ लाख ४२ हजार ४५० मतदार असून ते गुरूवारी प्रत्यक्ष मतदान करून आपले मत नोंदविणार आहेत.

ठळक मुद्देपोलिंग चमू रवाना : १५ हजार नवमतदारांचे प्रथम मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होय. ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून गुरूवार ११ एप्रिलला पार पडणार आहे. वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण १७ लाख ४२ हजार ४५० मतदार असून ते गुरूवारी प्रत्यक्ष मतदान करून आपले मत नोंदविणार आहेत. विशेष म्हणजे यंदा १५ हजार २७२ नवमतदार असून ते पहिल्यांदाच राष्ट्रीय कर्तव्य बजावणार आहेत. बुधवारी वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील तालुकास्थळावरून निवडणूक साहित्य घेऊन पोलिंग चमू नियोजित ठिकाणी रवाना झाल्या.वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव व मोर्शी ही एकूण सहा विधानसभा मतदार क्षेत्र आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण १५ लाख २७ हजार ८९८ मतदार होते. तर यंदाच्या वेळी मतदार जागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात आल्याने ही संख्या २ लाख १४ हजार ५५२ ने वाढली आहे. विशेष म्हणजे यंदा १८ ते १९ वयोगटातील १५ हजार २७२ तर वयाचे शतक पार केलेले ९८२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वर्धा लोकसभा क्षेत्रात एकूण १७ लाख ४२ हजार ४५० मतदार असून त्यात ८ लाख ९३ हजार ७३० पुरुष, ८ लाख ४८ हजार ७०१ स्त्री तर १९ इतर मतदार आहेत. प्रत्येक मतदाराने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअरची सुविधाएकूण २०२६ मतदार केंद्रांवरून गुरूवारी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या केंद्रांवर दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.आवश्यक माहिती जाणून घेत निवडणूक विभागाने १ हजार २२५ ठिकाणी व्हीलचेअर ठेवण्याचे नियोजन केले आहे. याचा लाभ दिव्यांग बांधवांना होणार आहे.जऊरवाड्याला पोलिंग चमू दुपारी पोहोचलीवर्धा-नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आणि वर्धा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जऊरवाडा (खुर्द) येथे लोकसभा निवडणूक मतदानाच्या अनुषंगाने बुधवारी तालुका स्थळावरून निघालेली पोलिंग चमू दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोहोचली. तेथे दिव्यांग व इतर मतदारांसाठी सर्व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.प्रत्येक केंद्रावर राहणार दोन स्वयंसेवकवृद्ध, दिव्यांग अशा मतदारांना मतदान करताना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक मतदार केंद्रावर दोन स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण २०२६ मतदार केंद्र असून १४ ते १७ वयोगटातील स्काऊट गाइडचे स्वयंसेवक गुरूवारी सेवा देणार आहेत.मतदान प्रक्रियेसाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. शिवाय मतदान केंद्रांवर दिव्यांग बांधवांसाठी विशेष सोई-सूविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुरूवारी प्रत्येक मतदाराने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावावा.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019