शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; बंदीवान मतदानापासून वंचितराहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 23:37 IST

न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदीवानांसाठी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु, अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे वर्धा लोकसभा मतदार संघासह इतर लोकसभा मतदार संघातील विविध कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले बंदीवान मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअमरावती व वर्धेच्या कारागृहात ८५० कैदी

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदीवानांसाठी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु, अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे वर्धा लोकसभा मतदार संघासह इतर लोकसभा मतदार संघातील विविध कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले बंदीवान मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्हा कारागृह वर्ग १ ची अधिकृत एकूण बंदी क्षमता २५२ आहे. त्यात २४३ पुरुष तर ९ महिलाचा आहे. असे असले तरी या कारागृहात सध्या स्थितीत क्षमतेपेक्षा जास्त बंदीवान आहेत. वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी या चार विधानसभा क्षेत्रासह अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (रेल्वे) व मोर्शी या दोन विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. सन १८६८ साली स्थापन झालेल्या वर्धा जिल्हा कारागृहात सध्या स्थितीत एकूण ३८५ बंदीवान आहेत. त्यापैकी विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले ३५ बंदीवान असून न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेले ३५० बंदीवान आहेत. तर अमरावती जिल्हा कारागृहात विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले सुमारे ७०० तर न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेले सुमारे ५०० बंदीवान आहेत. केवळ दोन जिल्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदीवानांची संख्या ८५० इतकी असली तरी भारत देशाचा विचार केल्यास हा आकडा लाखांच्यावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयीन बंदीवानांना पोस्टल पद्धतीने मतदाराचा हक्क बजावता येत असला तरी त्यासाठी लेखी मागणी झाल्यावर न्यायालयाची परवानगी गरजेची असते. शिवाय निवडणूक विभागाकडून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या बंदीवानासाठी बॅलेट पेपर पाठविला जातो. परंतु, वर्धा लोकसभा क्षेत्राचा विचार केल्यास आतापर्यंत न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाही बंदीवानाकडून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लेखी मागणी झालेली नाही.शिवाय न्यायालयीन कोठडीत एकही बंदीवान मतदानापासून वंचित राहू नये यासाठी कुठल्याही अधिकाऱ्याने तशी तसदी घेतली नसल्याचे दिसते. विशेष म्हणजे मागील १५ वर्षात वर्धा कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगत असलेल्या एकाही बंदीवानाने मतदानाचा हक्क बजावला नसल्याचे वास्तव आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभाग विविध उपक्रम राबवित असला तरी यंदाही समाजातील हा घटक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानाला कारागृहातून मतदान करता येत नसले तरी न्यायालयीन कोठडी भोगत असलेल्या बंदीवानांना मतदानाचा हक्क बजावता येतो. सदर बंदीवानाने लेखी मागणी केल्यावर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून त्याच्यासाठी बॅलेट पेपर पाठविला जातो. आतापर्यंत अमरावती व वर्धा या दोन जिल्हा कारागृहातून मतदानासाठी एकाही बंदीवानाची लेखी मागणी आमच्याकडे आलेली नाही. मागणी झाल्यास बॅलेट पेपर उपलब्ध करून देऊ.- प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वर्धा.मागील १५ वर्षात वर्धा जिल्हा कारागृहातील एकाही न्यायालयीन बंदीवानाने मतदान केलेले नाही. शिवाय आतापर्यंत एकाही बंदीवानाने मतदानासाठी लेखी मागणी केली नाही. बंदीवानाकडून मागणी झाल्यावर न्यायालयाची परवानगी गरजेची असते.- अनिल खामकर, अधीक्षक वर्धा जिल्हा कारागृह, वर्धा.

टॅग्स :jailतुरुंगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक