शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; यादीत नावे नसल्याने मतदारांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:52 IST

येथील मतदारयादीत अनेकांची नावे नसल्याने मतदारांना नावे शोधण्यासाठी दिवसभर पायपीट करावी लागली. आॅनलाईन सर्च करून सुद्धा नावे मिळत नसल्याने एकच गोंधळ उडाला. बहुतेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

ठळक मुद्देआॅनलाईन सर्च करूनसुद्धा नावे न मिळाल्याने गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : येथील मतदारयादीत अनेकांची नावे नसल्याने मतदारांना नावे शोधण्यासाठी दिवसभर पायपीट करावी लागली. आॅनलाईन सर्च करून सुद्धा नावे मिळत नसल्याने एकच गोंधळ उडाला. बहुतेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले.स्थानिक न.प. क्षेत्रातील मतदान एकूण पाच प्रभागांत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे प्रभागाप्रमाणे मतदारांची सूची अपेक्षित होती. परंतु, असे न करता पाचही प्रभागांतील मतदारांची नावे एकमेकांत टाकून गुंतवणूक करण्यात आली. त्यामुळे मतदारांना आपली नावे शोधण्यासाठी सर्व प्रभागाची मतदार यादी पडताळून पाहावी लागली. यातही अनेकांची नावे मतदार सूचीतून गायब असल्याने आॅनलाईन सर्च करावी लागली. यात काहींची नावे मिळाली, तर अनेकांची नावे गहाळ दिसली. मोबाईलची नेट सिस्टीमसद्धा काम करीत नसल्याने नावे मिळण्यास अडचण निर्माण झाली.सकाळपासून शहरातील मतदारांत उत्साह पाहण्यात आला. मतदारांनी स्वयंस्फूर्तीने प्रक्रियेत सहभाग दिला. भाजपाचे उमेदवार व विद्यमान खासदार रामदास तडस यांनी कुटुंबीयांसमवेत यशवंत कन्या शाळेच्या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. कॉँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी कोल्हापूर (राव) मुक्कामी मतदान केले. मतदानात उत्साह असला तरी मतदारातील घोळामुळे मतदानाच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019