शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; १४ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:38 IST

वर्धा लोकसभा मतदारक्षेत्रात गुरूवारी झालेल्या मतदानात सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण मतदारांपैकी ५५.३८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदान सुरूच होते. त्यामुळे मतदानाचा टक्का ६५ पार होईल, अशी शक्यता आहे.

ठळक मुद्देसुमारे ६५ टक्के मतदान : काही ठिकाणी मशीनमध्ये आला होता क्षुल्लक तांत्रिक बिघाड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा मतदारक्षेत्रात गुरूवारी झालेल्या मतदानात सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण मतदारांपैकी ५५.३८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदान सुरूच होते. त्यामुळे मतदानाचा टक्का ६५ पार होईल, अशी शक्यता आहे. मतदानानंतर चौदाही उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून कुणाला बहुमताचा कौल मिळाला, हे आता मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी आणि अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (रेल्वे) व मोर्शी हे सहा विधानसभा क्षेत्र मिळून वर्धा लोकसभा क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. गुरूवारी निवडणुकीचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सकाळी ७.३० वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सुरूवातीला काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये क्षुल्लक तांत्रिक दोष निर्माण झाल्याने मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांसह मतदारांची तारांबळ उडाली होती. मात्र, त्यानंतर तज्ज्ञांनी वेळीच मतदान केंद्र गाठून तांत्रिक दोष दूर करून प्रक्रिया सुरळीत केली. गुरूवारी वाढत्या उन्हाची तमा न बाळगता शहरी व ग्रामीण भागातील मतदारांनी उत्साहाने मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. विशेष म्हणजे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे.तज्ज्ञांनी दूर केला मशीनमधील तांत्रिक बिघाडगुरूवारी मतदानासाठी मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साह असल्याचे बघावयास मिळाले. तर नवमतदार पहिल्यांदाच मतदान करणार असल्याने त्यांच्यात एक नवाच उत्साह होता. सकाळी ९ वाजेपर्यंत वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात ७.०२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर हा आकडा सकाळी ११ वाजता १५.७६ टक्केवर पोहोचला. मात्र, दुपारी पारा वाढल्याने मतदान प्रक्रिया कासवगतीनेच पुढे सरकत गेली. महाराष्ट्र वखार महामंडळ मतदान केंद्र क्रमांक २७३, पिपरी (मेघे) येथील जि.प. शाळासह आणखी काही मतदान केंद्रांवरील मशीनमध्ये क्षुल्लक तांत्रिक बिघाड आला होता. परिणामी, मतदान प्रक्रिया खोळंबली होती. मात्र, त्यानंतर तज्ज्ञांनी वेळीच दूर तो करून मतदान प्रक्रिया सुरळीत केली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019