शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; जिल्ह्यात सर्वत्र महिला मतदारांचा प्रचंड उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:55 IST

लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांचा मतदानात प्रचंड उत्साह दिसून आला. लोकसभा मतदार संघातील २ हजार २६ मतदान केंद्रांवर महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले.

ठळक मुद्देकेंद्रांवर महिलांच्याच रांगा : मतदानाचा टक्का वाढविला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांचा मतदानात प्रचंड उत्साह दिसून आला. लोकसभा मतदार संघातील २ हजार २६ मतदान केंद्रांवर महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले.अनेक मतदान केंद्रांवर दिवसभर महिलांच्या रांगा दिसून येत होत्या. काही मतदान केंद्र तर महिलांनीच भरून असल्याचे दिसून आले. महिला मतदारांच्या या वाढत्या टक्क्यामुळे निवडणुकीच्या निकालावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वर्धा लोकसभा मतदार संघात एकूण ८ लाख ४८ हजार ७०१ महिला मतदार आहेत. सायंकाळी ५ वाजेपर्यंत वर्धा लोकसभा मतदार संघात ४ लाख ३६ हजार १८१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. धामणगाव (रेल्वे) विधानसभा मतदार संघात १ लाख ५३ हजार २९ महिला मतदारांपैकी ७५ हजार ७८३, मोर्शी मतदार संघात १ लाख ३९ हजार मतदारांपैकी ७१ हजार ७८२ महिला मतदारांनी मतदान केले. आर्वी विधानसभा क्षेत्रात १ लाख २७ हजार १८८ मतदारांपैकी ७० हजार ८८१ मतदारांनी मतदान केले. देवळी मतदार संघात १ लाख ३१ हजार ४५६ मतदारांपैकी ६६ हजार ९८७ महिला मतदारांनी मतदान केले. हिंगणघाट येथे १ लाख ४३ हजार १८ महिला मतदारांपैकी ७५ हजार ८३७ मतदारांनी मतदान केले. वर्धा विधानसभा मतदार संघात १ लाख ५५ हजार ५० मतदारांपैकी ७४ हजार ९११ मतदारांनी मतदान केले. लोकसभा क्षेत्रातील ८ लाख ४८ हजार ७४१ महिला मतदारांपैकी ४ लाख ३६ हजार १८८ मतदारांनी केले. जवळपास ५१.३९ टक्के महिलांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. विविध ठिकाणी महिला मतदारांच्या रांगा मोठ्या प्रमाणावर लागून होत्या. महिला मतदारांमध्ये नवमहिला मतदारही मोठ्या प्रमाणात मतदानासाठी आल्या. महिलांची ही मतदानाची टक्केवारी पाहता या मतदारसंघात महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019