शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; ६.७६ लाख मतदारांची मतदानाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वर्धा लोकसभा निवडणूक २०१४ च्या तुलनेत यंदा तब्बल २ लाखांवर मतदारांच्या संख्येत वाढ झाली ...

ठळक मुद्देदोन लाख मतदार वाढले; पण राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्यांचा टक्का घसरला!

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धालोकसभा निवडणूक २०१४ च्या तुलनेत यंदा तब्बल २ लाखांवर मतदारांच्या संख्येत वाढ झाली असली तरी गुरूवारी झालेल्या मतदानादरम्यान चक्क ६.७६ लाख मतदारांनी मतदान करण्याकडे पाठ दाखविल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.निवडणूक विभागाने मतदानाचा टक्का वाढावा तसेच एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने ठिकठिकाणी मतदार नोंदणी कार्यक्रमासह जनजागृती केली. त्याचाच परिणाम म्हणून वर्धा लोकसभा मतदारक्षेत्रात यंदा सुमारे २ लाख १४ हजार ५५२ मतदारही वाढले. हे नवीन मतदार आणि जुने मतदार गुरूवारी प्रत्यक्ष मतदान करून निश्चितच मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढवेल, असा अंदाज निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना होता. परंतु, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी तब्बल ६ लाख ७६ हजार १२२ मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याकडे पाठच दाखविल्याचे वास्तव आहे. उल्लेखनीय म्हणजे, मतदानाचा दिवस असलेल्या गुरुवारी शासकीय कार्यालयांसह शाळा व महाविद्यालयांना पूर्ण दिवसाची सुटी तर खासगी कंपन्या आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये काम करणाºया कामगारांना दोन तासाची सुटी मतदानासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या आदेशान्वये देण्यात आली होती. मात्र, मतदानाची टक्केवारी शहरी भागात वाढली नाही. वर्धा शहरातही अत्यल्प प्रमाणात मतदान झाले. सर्वांत कमी मतदान वर्धा क्षेत्रातच झाले.मतदानाचा टक्का घसरण्याची कारणेकेंद्रीय निवडणूक आयोगाने व्होटर स्लिप पाठविण्याचे काम बीएलओ मार्फत केले जाईल असे जाहीर केले होते. शहरी व ग्रामीण भागात बीएलओंनी व्होटर स्लिप प्रभावीपणे वाटल्याच नाही. त्यामुळे मतदारांना आपले मतदान कोठे आहे, यादीचा अनुक्रमांक काय आहे, आदी बाबी माहीत नव्हत्या. मतदान केंद्रावर गेल्यावर ते विविध ठिकाणी चौकशी करीत होते. मात्र, त्यांना कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अनेक मतदार परत गेले. याचा फटका टक्केवारीला बसला.महिनाभरापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांवेळी मतदान केंद्र व आताचे मतदान केंद्र याच्यातही बºयाच ठिकाणी बदल झाले. ग्रामपंचायतीच्या वेळी असलेला यादीतील मतदाराचा अनुक्रमांक लोकसभा निवडणुकीच्या वेळी बदलला त्यामुळे अनेकांना नव्या यादीत नाव कुठे आहे याची माहिती झाली नाही. त्यामुळे ते मतदान न करताच परतले.वर्धा लोकसभा क्षेत्रात गुरुवारी तापमान ४१ अंशांच्या आसपास होते. त्यामुळे मतदार घराबाहेर पडले नाही. जे पडले त्यांना यादीत नाव सापडले नाही. काहींनी अ‍ॅप वरून नावे शोधली. या सर्व गडबडीत अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले.प्रशासनाने मार्च महिन्यात नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी २ आणि ३ मार्चला विशेष मोहीम राबविली होती. यात नोंदणी केलेले अनेक नाव मतदार यादीत आलेच नाही. त्यामुळे याचा फटका प्रत्यक्ष मतदानावर पडला.ग्रामपंचायत निवडणुकीच्यावेळी ज्या पद्धतीने मतदारांना राजकीय पक्षांकडून मतदानाबाबत घरोघरी जाऊन आवाहन केले जात होते. त्या पद्धतीने या निवडणुकीत काम राजकीय पक्षांनीही केले नाही. त्यामुळे जे मतदार स्वत:हून केंद्रापर्यंत आलेत त्यांनीही मतदान केले.समन्वयाचा अभाव?वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील निवडणूक पारदर्शी होत मतदानाचाही टक्का वाढावा या हेतूने येथे निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदींची नियुक्ती करण्यात आली. परंतु, निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच त्याखालील अधिकारी यांच्यात प्रत्यक्ष काम करताना समन्वयाचा अभाव राहिल्याने यंदा मतदानाचा टक्का घसरल्याची चर्चा सध्या शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.३.५७ टक्क्यांनी घसरण२०१४ लोकसभा निवडणुकीदरम्यान १५ लाख २७ हजार ८९८ मतदारांपैकी ६४.७५ टक्के मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले होते. परंतु, यंदा १७ लाख ४१ हजार ९०० मतदारांपैकी केवळ १० लाख ६५ हजार ७७८ मतदारांनी मतदान केले. यंदा मतदानात ३.५७ टक्क्यांनी घसरणच झाली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019