शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तिजोरीला लॉकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा होतो. या संपूर्ण ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात १ लाखावर ग्राहक संख्या आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी, जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने वगळता सर्व काही ठप्प होते. त्यामुळे मीटर रिडिंग घेण्याचे कामही ठप्प होते.

ठळक मुद्देकोरोनायन । पाणी देयकापोटी ६० लाखांची वसुली खोळंबली

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणााच्या वसुलीला मोठा फटका बसला. मागील दोन महिन्यांत ग्राहकांकडे तब्बल ६० लाखांची देयके थकली.शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा होतो. या संपूर्ण ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात १ लाखावर ग्राहक संख्या आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी, जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने वगळता सर्व काही ठप्प होते. त्यामुळे मीटर रिडिंग घेण्याचे कामही ठप्प होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी देयक प्रिंटिंग आणि वितरणाचा कंत्राट नागपूर येथील गणेश इंजिनिअरिंग या कंपनीला दिला आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने वर्ध्यापूर्वी नागपुरात लॉकडाऊनसह संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली.त्यामुळे जीवन प्राधिकरणाची पाणी बिले प्रिंट होण्यात आणि पर्यायाने वितरणातही अडथळा निर्माण झाला. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासन-प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून प्राधिकरणानेही वसुलीला या दोन महिन्यांच्या कालावधीत थांबा दिला.मजिप्राला दरमहा पाणीपुरवठ्याच्या देयकापोटी सरासरी ३० लाखांचा महसूल प्राप्त होतो. दोन महिने सर्व काही ठप्प असल्याने तब्बल ६० लाखांची वसुली थकली. लॉकडाऊनमध्ये शासनाने शिथिलता आणल्याने सुरू महिन्यापासून नियमित पाणी देयके वितरित होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आली.देयकासाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करावाकोरोना विषाणू संसर्गाचे सावट कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे देयकाकरिता कार्यालयात येणेच गरजेचे नाही. देयक भरणा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ऑनलॉईन प्रणाली आहे. या माध्यमातून ग्राहकांना पाणी देयक अदा करता येणार आहे. नागरिकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहनही प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत