लॉकडाऊनने बदलले व्यवसायाचे संदर्भ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 05:00 AM2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:00:07+5:30

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात मार्च महिन्यांपासून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यानच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व काही ठप्प होते. हातावर आणून पोट भरणाऱ्यांची कोरोना इष्टापत्तीने रोजी रोटीच हिरावल्याने अनेक कुटुंबांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला.

Lockdown changed business context | लॉकडाऊनने बदलले व्यवसायाचे संदर्भ

लॉकडाऊनने बदलले व्यवसायाचे संदर्भ

Next
ठळक मुद्देपाणी पुरीच्या गाडीतून फळ तर निंबू सरबताच्या गाडीवर होतेय मास्कविक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले. दरम्यान, सर्वच व्यवसाय ठप्प पडले होते. या काळात अनेकांनी पारंपरिक व्यवसाय बदलले. पाणीपुरी विकत असलेल्या गाडीतून चक्क फळांची विक्री सुरूञकेली, तर काहींनी लस्सी, निंबू सरबताच्या गाडीवरून मास्क विक्री सुरू केली आहे.
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात मार्च महिन्यांपासून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यानच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व काही ठप्प होते. हातावर आणून पोट भरणाऱ्यांची कोरोना इष्टापत्तीने रोजी रोटीच हिरावल्याने अनेक कुटुंबांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. शहरात शेकडोवर पाणीपुरी, दाबेली, नुडल्स, मंच्युरियन आणि इतर खाद्यपदार्थ, शीतपेय विक्रेते आहेत. सकाळी आणि सायंकाळी हे विक्रेते हातगाडीच्या माध्यमातून दररोज पाणीपुरी व इतर खाद्यपदार्थांची विक्री करतात. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा दिली. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली. पाणीपुरी व जंक फूड विक्रीच्या हातगाड्या सायंकाळनंतरच लागतात. वेळेच्या मर्यादेमुळे आणि खाद्य पदार्थ विक्रीच्या हातगाड्यांवर शौकिनांची सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत उसळत असलेली गर्दी पाहता कोरोना संक्रमणाचा धोका उद्भवू शकतो, हे लक्षात घेऊन प्रशासनाने या व्यवसायावरही बंदी घातली.
कोरोनाचा संकटकाळ कधी संपेल, हे आज कुणालाही सांगणे अवघड आहे. त्यामुळे अनेकांनी पारंपरिक व्यवसाय बदलले. आज शहरात एकेकाळी पाणीपुरी विकणाºया युवकांनी फळविक्रीचा तर निंबू सरबत विकणाऱ्यांनी मागणी लक्षात घेऊन मास्कविक्रीचा व्यवसाय स्वीकारला आहे. लॉकडाऊनपूर्वी व्यवसाय करणाºयांनी अनलॉक सुरू होत असताना आपले व्यवसाय बदलल्याचे चित्र आहे.

डेकोरेशन व्यावसायिक विकतोय भाजीपाला
मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने लग्नसराईच्या हंगामाचे असतात. यावेळी कोरोना विषाणू संसर्गामुळे लग्न व इतर समारंभांवर बंदी घालण्यात आली. याचाच परिणाम, सजावट साहित्याचा व्यवसाय करणाºया व्यावसायिकांपुढेही मोठे संकट आर्थिक उभे ठाकले. कुटुंबाच्या उपजीविकेकरिता अनेकांनी भाजी आणि फळविक्रीचा व्यवसाय स्वीकारला आहे. एका डेकोरेशन व्यावसायिक युवक शहरातील विविध भागात फिरत हातगाडीवरून भाजीपाल्याची विक्री करीत आहे.

Web Title: Lockdown changed business context

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.