शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वीच्या थकबाकी वसुलीचा लोड; तर आता मान्सून पूर्व कामांची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 05:00 IST

मान्सूनपूर्व कामांची डेडलाईन देण्यात आल्याने पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. जिल्ह्यात सध्या भारनियमन लागू करण्यात आलेले नाही; पण हीच मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी विविध भागातील विद्युत पुरवठा काही तासांसाठी खंडित केला जात आहे. तसेच शहरी, ग्रामीण भागात देखभाल, दुरस्तीच्या कामासाठी सुध्दा अनेकदा तात्पुरता खंडीत केला जातो. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मान्सूनचे आगमन होताच वादळीवारा आणि पावसामुळे बहुधा विद्युत तारा तुटतात. त्यामुळे महावितरणला मोठे नुकसानच सोसावे लागते. हे नुकसान टाळता यावे या हेतूने पावसाळ्यापूर्वी विविध कामे महावितरण हाती घेत असून हीच कामे २० मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे पूर्वीच्या थकबाकी वसुलीमुळे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. अशातच आता मान्सूनपूर्व कामांची डेडलाईन देण्यात आल्याने पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. जिल्ह्यात सध्या भारनियमन लागू करण्यात आलेले नाही; पण हीच मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी विविध भागातील विद्युत पुरवठा काही तासांसाठी खंडित केला जात आहे. तसेच शहरी, ग्रामीण भागात देखभाल, दुरस्तीच्या कामासाठी सुध्दा अनेकदा तात्पुरता खंडीत केला जातो. 

चार महिन्यांत १८ कोटींची वसूली- कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणकडून वसुली पथके नेमण्यात आली. याच पथकांनी विशेष मोहीम शहरी व ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवून मागील चार महिन्यांत तब्बल १८ कोटींची थकबाकी वसूल केल्याचे वास्तव आहे. तशी नोंद महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाने घेतली आहे.

वसुलीसाठी १३ पथके-  कोटींच्या थकबाकीने महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण वाढली आहे. थकबाकी वसुलीसाठी जिल्ह्यात किमान १३ पथके तयार करण्यात आली असून याच पथकांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात धडक वसुली मोहीम राबविली जात  आहे.  ग्राहकांना आवाहन केले जात आहे.

पथदिवे लावण्याचे काम- पावसाळा लागण्यापूर्वी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती गावात अंधार होऊ नये म्हणून पथदिवे लावण्याचे काम हाती घेतात. त्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते. ते गावातील खांबावर दिवे लावून देतात.

पावसाळी कामे कोणती?- महावितरण मान्सूनपूर्व कामे हाती घेत असून या कामांदरम्यान विद्युत वाहिनीवर आलेल्या वृक्षांच्या फांद्या तोडल्या जातात. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी विद्युत खांब वाकलेे असतील ते व्यवस्थित करण्यासह लोंबकळत असलेल्या विद्युत तारा व्यवस्थित केल्या जात असल्याचे सांगण्यात आले. ही कामे करताना खबरदारीचा उपाय म्हणून काही काळाकरिता त्या भागातील विद्युत पुरवठा खंडित केला जातो. शहरी व ग्रामीण भागात विद्युत रोहित्र त्यावरील भार पाहून बदलविण्याचे कामही केले जाते. वीज पडल्याने इन्सुलेटर उडतात. त्याचा आवश्यक स्टाॅक उपलब्ध करून ठेवावा लागतो.

निम्म्याहून अधिक भागातील कामे पूर्ण- मे महिन्यांच्या सुरुवातीलाच महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली. जिल्ह्यातील १३ उपकेंद्रांपैकी निम्म्याहून अधिक भागात पावसाळापूर्वीची कामे पूर्ण झाली आहेत. तर काही ठिकाणी युद्धपातळीवर कामे पूर्ण केली जात आहेत. २० मे पर्यंत जिल्ह्यातील विविध भागातील ही कामे पूर्ण करण्याचा मानस महावितरणचा आहे.

अन्यथा सोसावे लागते नुकसान- मान्सूनचे आगमन होताच वादळीवाऱ्यासह पाऊस होतो. अशातच विद्युत तारांवरील झाडांच्या फांद्या तुटून बहुधा विद्युत वाहिन्या तुटतात. त्यामुळे महावितरणला मोठे नुकसान सोसावे लागते. त्यामुळे वेळीच मान्सूनपूर्व कामे पूर्ण होणे गरजेचे असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने सांगितले.

 

टॅग्स :electricityवीज