दिलीप चव्हाण सेवाग्राम‘माणूस म्हणून जगायला शिकण्यासाठी’ ही थीम घेऊन पुणे येथील तीन विद्यार्थी सायकलने विदर्भ अभ्यास दौऱ्यासाठी आलेत़ विदर्भातील अतिदुर्गम, आदिवासी, नक्षलग्रस्त भाग आदींची पाहणी करून महात्मा गांधी आश्रमात पोहोचले़आदर्श पाटील, श्रीकृष्ण शेवाळे व विकास वाळके हे पुणे येथे महाविद्यालयात शिकणारे युवक पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व कोंकण येथील माणसे सदैव टिका करणारी व आमचा विकास झाला नाही, ही बोंब मारणारा, अशी गैरसमजूत करतात; पण प्रगतीचा कार्यबिंदू माणूस आहे. आज संकुचितपणा, संवाद व संपर्क यांचा अभाव दिसून येतो. माणूस माणसापासून दुरावत आहे. समाज व विकासाचा घटकच माणूस असल्याने माणसातील माणूस जगला पाहिजे. सर्वांना समान संधी शिक्षण, नोकरी, व्यवसाय यात मिळावी; पण आज सर्वत्र विरोधाभास आहे. भौगोलिक परिस्थितीसह आर्थिक व विकासाच्या बिकट अवस्थेत लोक जगताहेत, हा अनुभव आल्याचे तीनही युवकांनी सांगितले. पुण्यावरून नागपूरला आल्यानंतर २३ आॅक्टोबर रोजी उमेरड, भेंडाळा, सोमनाथ, शोधग्राम, बोथली, एटापल्ली, कांदोली, हेमलकसा, सिरोंचा, नागापल्ली, आनंदवन आणि सेवाग्राम, असा प्रवास झाला़ आज (दि़५) पवनार व पूढे नागपूरवरून पुण्याकडे रवाना होणार आहे़ आम्ही सात युवक निघणार होतो. अनेकांनी आम्हाला मुर्खात काढले; पण मनात आलेली थीम पूर्ण करायची होती. त्यासाठी आम्हाला माणसांना भेटून संवाद साधायचा होता. आपण एक समान असल्याची भावना प्रत्यक्ष भेटून साकार करायची होती. आदिवासी, दुर्गम भाग व नक्षलवादी क्षेत्रात आम्ही फिरलो. सर्वत्र चांगली वागणूक मिळाली. संस्थेपेक्षा सरकारी यंत्रणेवर मोठा रोष दिसून आला. डॉक्टर, अधिकारी, शिक्षक आदींना नक्षलवाद्यांचा त्रास नाही. उलट गावकरी त्यांचे समर्थन करताना दिसून आले. जंगलव्याप्त भागात मुलभूत सुविधांचा अभाव दिसून आला. गावात सिमेंट रोड झाले; पण फारच कमी लोकांना वीज मिळाली़ शाळा, कार्यालय, दवाखाना आदी ठिकाणी मनुष्यबळच दिसत नाही. येथे काम करण्यास कुणी तयार नसल्याने प्रगती झाली नाही. उलट बाह्य लोकांनीच नक्षलवादील भावनेला खतपाणी घातल्याचे यात्रेत दिसून आले़ बापूंच्या आश्रमात प्रेरणा मिळाली़ मार्गदर्शनाने उत्साहात भर पडली. यातून थीमला बळकटी मिळेल, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला़
‘माणूस म्हणून जगायला शिकण्यासाठी’
By admin | Updated: November 6, 2014 02:09 IST