शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मध्य प्रदेशातूनही येते दारूची 'खेप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:39 IST

गांधी - विनोबांच्या कर्मभूमीत दारूबंदीचा 'बार' ठरला फुसका

रवींद्र चांदेकर लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या कर्मभूमीत दारूबंदीचा 'बार' फुसका ठरला आहे. दारूबंदी नावालाच उरली असून, वर्धा जिल्ह्यात थेट मध्य प्रदेशातून दारूची 'खेप' जिल्ह्यात येत आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्रामला आश्रम तयार करून तेथे वास्तव्य केले. याच आश्रमातून अनेक चळवळींचा जन्म झाला. आचार्य विनोबा भावे यांनी पवनार येथे आश्रम स्थापन करून भुदान चळवळ राबविली. परिणामी, वर्धा जिल्ह्याला देशात वेगळी ओळख प्राप्त झाली. त्यामुळेच शासनाने १९७४ पासून जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली. त्याला आता ५१ वर्षे लोटली आहेत. मात्र, ही दारूबंदी फसवी निघाल्याचे दिसून येत आहे. शासनाने महसूल वाढीसाठी राज्यात दारू विक्रीचे परवाने दिले. बीअर शॉपींना परवानगी दिली. सध्या राज्यात जवळपास २० हजारांच्यावर परवानाधारक आहेत. यात रेस्टॉरंट, 'बार'चा समावेश आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांत गावठी हातभट्टीची दारूही गाळली जाते. पोलिसांच्या छाप्यांवरून ही बाब सिद्ध होते. वर्धा जिल्ह्यातही शेत, नदी, नाले, गाव, आदी ठिकाणी हातभट्ट्या पेटतात. जिल्ह्याशेजारील नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, आदी जिल्ह्यांतून दारूची खेप जिल्ह्यात पोहोचते. 

हॉटेलात दारू पिण्यास मनाईचे फलकजिल्ह्यात येणारी दारू रोखण्याची पहिली जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागावर आहे. नंतर पोलिसांवर ही जबाबदारी येते. मात्र, त्यांच्या कारवाया नाममात्र असल्याचे दिसून येते. दारू विक्रेत्यांवर 'वर्दी'चा वचक दिसून येत नाही. 'वर्दी'तील काही चेहरेच दारूचे 'दर्दी' असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे जिल्ह्यात अनेक ठिकाणी केवळ एक फोन केल्यास दारू विक्रेते थेट घरपोच सेवा देतात. काही हॉटेलमध्ये तर दारूबंदी असतानाही चक्क 'येथे दारू पिण्यास मनाई आहे', असे फलक लागलेले दिसून येतात

खासदारांचे शाह यांना साकडे५१ वर्षे उलटूनही दारूबंदी केवळ कागदावरच असून, जिल्ह्यात दारूबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे साकडे नुकतेच खासदार अमर काळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना घातले. खासदारांनी जिल्ह्यात पानटपरीपासून, घराघरांतून दारूविक्री केली जात असल्याचे त्यांना सांगितले.

पालकमंत्र्यांनीही वेधले लक्षजिल्ह्यात दारूबंदी प्रभावीपणे राबविण्यासाठी जप्त केलेल्या मुद्देमालाचे रासायनिक परीक्षण जलदगतीने व्हावे म्हणून जिल्ह्यात न्यायवैद्यक प्रयोगशाळा निर्माण करावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

दहा वर्षांत ५० हजार आरोपी निर्दोष...१० वर्षात २०१४ ते २०२४ पर्यंत जिल्ह्यात दारूबंदीचे ९३ हजार ५५४ गुन्हे दाखल करण्यात आले. ५१ हजार ३४० गुन्ह्यांचा निकाल लागला. ६७४ प्रकरणांत गुन्हा सिद्ध झाला. ५० हजार ६६६ गुन्ह्यांत आरोपी निर्दोष सुटले. यावरून दोषसिद्धीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.

टॅग्स :wardha-acवर्धा