शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

जि़प़ शिक्षकांच्या आपसी बदल्यांना आदेशाची वाट

By admin | Updated: April 30, 2015 01:49 IST

प्राथमिक शिक्षक तसेच गड क व ड च्या २०११-१२ मध्ये तालुकाबाह्य प्रशासकीय बदली झालेल्या ...

वर्धा : प्राथमिक शिक्षक तसेच गड क व ड च्या २०११-१२ मध्ये तालुकाबाह्य प्रशासकीय बदली झालेल्या जि़प़ कर्मचाऱ्यांच्या आपसी बदलीबाबत ग्रामविकास विभागाने निर्णय जारी केला़ त्यानुसार दिवाळीनंतर सुट्टीत व मे २०१५ च्या सर्व साधारण बदल्यांपूर्वी सुट्टीच्या कालावधीत सदर बदल्या कराव्यात, असे निर्देश आहेत़ इतर जिल्ह्यांत वेळेत सुरू झालेली ही कार्यवाही वर्धा जि़प़ शिक्षण विभागात प्रलंबित होती़ ती सुरु होण्याचे संकेत आहे. बदल्यांसाठी शासन निर्णयातील अटीनुसार पात्र शिक्षकांनी पं़स़ मार्फत जि़प़ कडे मे २०१५ पर्यंत अर्ज सादर करायचे आहे़ २०११ व २०१२ मध्ये तालुकाबाह्य प्रशासकीय बदली झालेल्या केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर व सहायक शिक्षक हे तालुक्यात जाऊ शकतील़ आपसी बदलीचा अध्यादेश शिक्षकांसाठी यापूर्वी २८ आॅक्टोबर २०१३ व आता २२ आॅगस्ट २०१४ रोजी जारी झाला़ यानुसार आपसी बदलीसाठी २०११ व २०१२ मध्ये तालुक्याबाहेर प्रशासकीय बदली झालेले कर्मचारीच पात्र असतील; पण दुसरा उमेदवार उपलब्ध होत नसल्यास प्रशासकीय बदलीस पात्र कोणताही शिक्षक कर्मचारी आपसी बदलीस पात्र ठरविला जाईल़ आपसी बदलीस इच्छुक कर्मचाऱ्यांचे संमतीपत्र आवश्यक आहे़ आपसी बदल्यांसाठी कोणत्याही टक्केवारीची मर्यादा नाही़ २०११, २०१२ मध्ये प्रशासकीय बदली झालेल्या आपसी बदल्यातील इच्छुक कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून सेवा कालावधीची अट लागू होणार नसल्याचे निर्णयात नमूद आहे़महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदन देत आपसी बदल्यांची कार्यवाही करण्याबाबत अवगत केले होते़ (कार्यालय प्रतिनिधी)