शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत शुकशुकाट, शेतकऱ्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर मर्यादा

By admin | Updated: November 10, 2016 00:54 IST

या निर्णयाचा सर्वाधिक फटका दैनंदिन व्यवहार आणि बाजारपेठेला बसला. शहरातील बाजारपेठेत सकाळीपासून शुकशुकाट होता.

या निर्णयाचा सर्वाधिक फटका दैनंदिन व्यवहार आणि बाजारपेठेला बसला. शहरातील बाजारपेठेत सकाळीपासून शुकशुकाट होता. कपडा असोसिएशन, किराणा असोसिएशन, कृषी व्यावसायिक संघटना, औषधी विक्रेता संघ आदींच्या वेगवेगळ्या बैठका पार पडल्यात. लहान दुकानदारांनी किरकोळ व्यवहार करावेत, मोठे व्यवहार करू नये. ५००, १००० च्या नोटा स्वीकारल्या जाऊ नये, असे ठरले. यामुळे बाजारपेठेमध्ये ग्राहकांची विशेष रेलचेल दिसून आली नाही. कपडा असोसिएशनद्वारे बुकींगवर वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात ‘नॉमीनल’ २०० ते ३०० रुपये घेऊन कपडा बुक करणे आणि व्यवहार सुरळीत झाल्यानंतर पूर्ण पैसे घेऊन वस्तू देण्याचे ठरले. प्रसंगी ओळखी आणि संबंध असल्यास उधारीवर व्यवहार केले जात असल्याचे पाहावयास मिळाले. असे असले तरी चेक, कार्ड पेमेंट वा इंटरनेट बँकींगद्वारे व्यवहार सुरळीत सुरू होते. सामान्य, गरीब नागरिकांना हे व्यवहार शक्य नसल्याने त्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्पच दिसून आले. सराफा बाजारामध्ये या निर्णयाचा मोठा प्रभाव दिसून आला. शेअर मार्केट घसरले आणि मंगळवारी ३०-३१ हजारांवर असलेले सोने बुधवारी ३४ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. शिवाय ४० हजार रुपयांपर्यंत सोन्याची विक्री होत असल्याचेही पाहावयास मिळाले. यात अनेक ठिकाणी ५००, १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील; पण सोने ४० हजार रुपये तोळे प्रमाणे घ्यावे लागतील, असे व्यवहार झाल्याचेही अनेकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी जनतेला शब्द दिला होता. ज्या गरीब जनतेने रक्ताचे पाणी करून धन मिळविले, ते धन भ्रष्टाचारी रुपातून जमवून ज्या गलेलठ्ठांनी आपल्या घरात, कानाकोपऱ्यात, जमिनीखाली पुरवून ठेवले, ते बाहेर काढण्यासाठी ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद करून आज खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला. त्याबद्दल जनतेत उत्साहाचे वातावरण असून जनता नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देत आहे. - रामदास तडस, खासदार, वर्धा.