शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाकलेल्या वीज खांबामुळे दुर्घटनेची शक्यता

By admin | Updated: August 5, 2016 02:06 IST

गावागावात वीज पोहोचविण्याकरिता असलेल्या तारांना आधार देण्याकरिता कंपनीच्यावतीने लोखंडी खांब उभे करण्यात येतात.

वीज वितरणचे दुर्लक्ष : अपघात टाळण्याकरिता दुरूस्ती गरजेची सेवाग्राम : गावागावात वीज पोहोचविण्याकरिता असलेल्या तारांना आधार देण्याकरिता कंपनीच्यावतीने लोखंडी खांब उभे करण्यात येतात. खांब पक्के बसावे याकरिता मोठा खड्डा करून त्यात सिमेंट काँक्रीट टाकण्यात येते; मात्र काही ठिकाणी त्या पद्धतीने खांब गाडले नसल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने खांब डळमळीत झाले आहे. जमिनीकडे वाकलेल्या या खांबामुळे जिवंत तारांचा स्पर्श होवून अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे. सेवाग्राम ते हमदापूर, बोंडसुला शिवारातील काही शेतातील वीज खांब वाकलेल्या अवस्थेत आहे. खांब वाकल्याने तारांवर ताण पडतो. पावसामुळे जमिनीकडील पकड कमकुवत झाल्याने खांब कोसळण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे कंपनीने वेळीच या खांबाची डागडुजी करून संभाव्य अपघात टाळावा अशी मागणी करण्यात येत आहे. जुनोना येथील शेतकरी ज्ञानेश्वर घोडे यांच्या शेतातील असेच दोन खांब वाकलेले होते. धोका लक्षात घेवून घोडे यांनी सेलू येथील वीज कार्यालयात मे महिन्यात अर्ज दिला होता. स्मरणपत्र दिले. जून महिन्यात वीज खांब जमीनदोस्त झाल्यावरच वीज कार्यालयाची धावाधाव सुरू झाली. यात वीज पुरवठा खंडितवर निभावल्याने धोका टळला. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)