शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

हनुमान टेकडीवर वृक्ष सुरक्षेसह प्रकाश व्यवस्था होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:44 IST

येथील हनुमान टेकडी वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे हरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण काही विघ्नसंतोषी येथे येत वृक्ष तथा साहित्याची तोडफोड करीत असल्याचे समोर आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी : ग्रीन जीम गाठत केला व्यायाम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील हनुमान टेकडी वैद्यकीय जनजागृती मंचद्वारे हरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण काही विघ्नसंतोषी येथे येत वृक्ष तथा साहित्याची तोडफोड करीत असल्याचे समोर आले. यात जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच या टेकडीवर भेट देत झाडांची पाहणी करीत येथे रात्रीसाठी प्रकाश व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. शिवाय झाडांच्या सुरक्षेकरिताही उपाययोजना आखण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय जनजागृती मंचच्या सदस्यांना दिले.यावेळी त्यांनी टेकडीवर सुरू झालेल्या ग्रीन जिमची पाहणी केली. शिवाय त्यांनी येथे काही वेळ व्यायामही केला. टेकडीवर त्यांच्याच मार्गदर्शनात वृक्षारोपण झाले आहे. वैद्यकीय जनजागृती मंच हनुमान टेकडीवर वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, जलसंवर्धन आदी विविध प्रकल्प राबवित आहे. या विविध प्रकल्पाची पाहणी त्यांनी केली. येथे सुरू करण्यात आलेल्या जलसिंचन विभागाच्या वेस्ट वॉटर मॅनेजमेंट प्रकल्पाची उपयोगिता व त्यांच्या कामाची पाहणीही त्यांनी केली. यावेळी ग्रा.पं. सरपंच अजय गौळकार उपस्थित होते.जिल्हाधिकारी नवाल येथे आले असता त्यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी श्रमदानही केले. यावेळी टेकडीवर काम करताना येणाऱ्या अडचणींबाबत व्हीजेएम सदस्य तसेच येथील नागरिकांनी त्यांना अवगत केले. यावर मार्ग काढण्याकरिता लवकरच टेकडीवर नागरिकांची, वृक्षांची सुरक्षा तसेच लाईट व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही दिली.यावेळी वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, सदस्य श्याम भेंडे, मंगेश दिवटे, प्रभाकर राऊत, महेश अडसुले, डॉ. बोबडे यासह नागरिकही उपस्थित होते.