आॅनलाईन लोकमतघोराड : सालई कला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले होते. बुधवारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर ते उघडण्यात येऊन डॉक्टरचीही तेथून उचलबांगडी करण्यात आली.आरोग्य केंद्राला कुलूप ठोकल्याचे कळताच बुधवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी सालई गाठत नागरिक व लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. यानंतर दुपारी २.३० वाजता आरोग्य केंद्राचे कुलूप उघडले गेले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद डोळसकर यांना सेलू पं.स. मध्ये तालुका आरोग्य अधिकारी पदाचा भार देण्यात आला. त्यांच्या जागेवर डॉ. सोडी यांची सालई आरोग्य केंद्रात नियुक्ती केल्याची माहिती डॉ. डवले यांनी ‘लोकमत’ला दिली. मंगळवारी रात्री पं.स. सदस्य योगेश रणनवरे, सरपंच गजानन दुरतकर व काही ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. डोळसकर गैरहजर होते. यामुळे दवाखान्यात रात्री कार्यरत कर्मचाºयांना बाहेर काढून कुलूप ठोकले. यापूर्वी पं.स. सदस्य रणनवरे यांनी आरोग्य केंद्राबाबत गटविकास अधिकाºयांकडे तक्रारी केल्या; पण कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप रणनवरे यांनी केला आहे. दवाखान्यात रात्री वैद्यकीय अधिकारी राहत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला.माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी मंगळवारी रजेवर होतो; पण इतर कर्मचारी रात्री कार्यरत होते. दवाखान्याला कुलूप ठोकल्याबाबतची माहिती मला मिळाली.- डॉ. अरविंद डोळसकर, वैद्यकीय अधिकारी, सालई (कला).
डिएचओंच्या भेटीनंतर सालई आरोग्य केंद्राचे उघडले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:25 IST
सालई कला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले होते.
डिएचओंच्या भेटीनंतर सालई आरोग्य केंद्राचे उघडले कुलूप
ठळक मुद्देवैद्यकीय अधिकाऱ्याला तालुका आरोग्य अधिकाऱ्याचा पदभार