लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विविध कंपन्यांची त्यांच्या खताचे दर निश्चित केले आहे. शिवाय सर्व कंपन्यांचा युरियाचे दर २६६ रुपये निश्चित करण्यात आले आहे. निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर कुठल्या कृषी केंद्र व्यावसायिकांनी शेतकऱ्यांकडून घेतल्यास त्या कृषी केंद्र व्यावसायिकाचा परवाना निलंबीत करण्याची कारवाई कृषी विभागाकडून करण्यात येणार आहे.जिल्ह्यात एकूण सुमारे १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. या व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये सध्या शेतकरी बियाणे व खताची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहे. शिवाय १ हजार ८७६ हेक्टरवर काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली आहे. अंकुरलेल्या पिकाची झपाट्याने वाढ व्हाची या हेतूने शेतकरी पिकांना रासायनीक खत देतात. परंतु, याच संधीचा फायदा घेत काही कृषी केंद्र व्यावसायिक खतकोंडी झाल्याचे कारण पुढे करून विविध खतांचे कंपन्यांनी निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर शेतकऱ्यांकडून उकळतात. याच मनमर्जी कामांना बे्रक लागावा म्हणून आता कृषी विभागाने कंबर कसली आहे. खतांचे निश्चित केलेल्या दरापैकी कुणी कृषी केंद्र व्यावसायिक जादा दर घेताना आढळल्यास त्या कृषी केंद्र व्यावसायिकावर खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.खत खरेदी करताना करा बिलाची मागणीशेतकऱ्यांनी कृषी केंद्रांमधून खत खरेदी करताना कृषी केंद्र व्यावसायिकाला खरेदी केल्या खताची शेतकऱ्यांनी मागणी करावी. जो कृषी केंद्र व्यावसायिक पक्के बिल देणार नाही त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.असे आहेत खतांचे निश्चित केलेले दरकोरोमंडलचे डीएपी (१,२५० रुपये), झेडएन १०.२६.२६ (१,२३५ रुपये), १०.२६.२६ (१,१८५ रुपये), २०.२०.०.१३ (१,००० रुपये), १४.३५.१४ (१,२७५ रुपये), १५.१५.१५.०९ (१,०४० रुपये), १२.३२.१६ (१,२०० रुपये), ग्रो स्मार्ट (१,२१० रुपये), एसएसपी (४०५ रुपये), इफकोचे १०.२६.२६ (१,१७५ रुपये), १२.३२.१६ (१,१८५ रुपये), डीएपी (१,२०० रुपये), महाधन २४.२४.० (१,२२० रुपये), १०.२६.२६. (१,२९५ रुपये), १२.३२.१६ (१,३०५ रुपये), २०.२०.०.१३ (१,०६५ रुपये), डीएपी (१,२५० रुपये), एसएसपी दाणेदार (३९० रुपये), आरसीएफचे सुफला १५.१५.१५. (१,०६० रुपये), युरिया (२६६ रुपये), आयपीएलचे पोटॅश (९५० रुपये), १६.१६.१६. (१,०७५ रुपये), कृषी उद्योगचे १८.१८.१० (१,०२५ रुपये), बसंत अॅग्रोटेकचे १८.१८.१० (१,०२५ रुपये), कृभकोचे डीएपी (१,२५० रुपये) दर निश्चित करण्यात आला आहे.लेखी अर्ज धरणार ग्राह्यएखाद्या शेतकऱ्याकडून कृषी केंद्र व्यावसायिकाने खताचे जादा दर घेतल्यास त्या शेतकऱ्याने तातडीने कृषी विभागाकडे लेखी अर्ज सादर करावा. सदर अर्जासोबत खरेदी केलेल्या खताचे बिल जोडणे क्रमप्राप्त आहे. तक्रार प्राप्त होताच कृषी विभागाकडून झटपट कारवाई करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. शिवाय कुठल्या कृषी व्यावसायिकांनी कंपन्यांनी निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर घेतल्यास त्याची लेखी तक्रार कृषी विभागाला करावी. तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.- संजय बमनोटे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा.
खताचे जादा दर घेतल्यास परवाना निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:00 IST
जिल्ह्यात एकूण सुमारे १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. या व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये सध्या शेतकरी बियाणे व खताची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहे. शिवाय १ हजार ८७६ हेक्टरवर काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली आहे. अंकुरलेल्या पिकाची झपाट्याने वाढ व्हाची या हेतूने शेतकरी पिकांना रासायनीक खत देतात.
खताचे जादा दर घेतल्यास परवाना निलंबित
ठळक मुद्देकृषी केंद्र व्यावसायिकांना कृषी विभागाची तंबी : युरियाचा दर २६६ रुपये निश्चित