शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बालकांना देणार वन्यजीव संरक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 22:25 IST

आजचा विद्यार्थी उद्याच्या विकसित भारताचा नागरिक असून मुला-मुलींमध्ये विद्यार्थी दशेतच वन्यजीव व वृक्षांबाबत आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शासकीय यंत्रणा विविध उपक्रम राबविते. बालमनांना वृक्षासह वन्यजीव संरक्षणाचे धडे मिळावे या हेतूने जिल्ह्यातील चार ठिकाणी विशेष केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २७.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

ठळक मुद्देचार ठिकाणी उभारणार विशेष केंद्र : २७.५० कोटी खर्च अपेक्षित

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आजचा विद्यार्थी उद्याच्या विकसित भारताचा नागरिक असून मुला-मुलींमध्ये विद्यार्थी दशेतच वन्यजीव व वृक्षांबाबत आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शासकीय यंत्रणा विविध उपक्रम राबविते. बालमनांना वृक्षासह वन्यजीव संरक्षणाचे धडे मिळावे या हेतूने जिल्ह्यातील चार ठिकाणी विशेष केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २७.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याबाबतचा प्रस्ताव संबंधितांना पाठविण्यात आला आहे.खेळता-खेळता मुला-मुलींना विविध वन्यप्राणी तसेच विविध प्रजातींच्या वृक्षांची माहिती मिळावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून वर्धा तालुक्यातील सेलूकाटे, पवनार, देवळी तालुक्यातील गुंजखेडा व आर्वी तालुक्यातील सारंगपुरी येथे वन विभागाच्या पुढाकारातून इको टुरिझम केंद्र तयार करण्यात येणार आहे. सदर चारही केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली असून पवनार येथील केंद्रासाठी ३ कोटी, सेलूकाटे येथील केंद्रासाठी १० कोटी, गुंजखेडा येथील केंद्रासाठी ९ कोटी तर सारंगपुरी येथील केंद्रासाठी ५.५० कोटी रुपये खर्च अपेक्षीत असल्याचा अंदाज वन विभागाकडून वर्तविला जात आहे.या विशेष केंद्राच्या माध्यमातून निसर्गाची ओळखच मुला-मुलींना होणार आहे. विशेष करून सदर केंद्र एकूण सहा ठिकाणी करण्याचे पुर्वी निश्चित करण्यात आले होते. परंतु, अंतिम टप्प्यात चार ठिकाण निश्चित करून त्याबाबतचा डीपीआर इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डला पाठविण्यात आला. त्या डिपीआरला मंजुरीही मिळाली आहे.सध्या सदर चारही केंद्राचा विषय अंदाजपत्रकाला मंजुरी मिळण्याच्या स्तरावर प्रलंबित आहे. त्याला तात्काळ हिरवी झेंडी देत प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाल्यास हे केंद्र वर्धेकरांसाठी फायद्याचे ठरणार आहे.सेवाग्राम विकास आराखड्यातून साकारणार पवनारचे केंद्रसेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून वर्धा शहरासह परिसरात अनेक विकास कामे केली जात आहेत. याच विकास आराखड्यातून वर्धा शहराशेजारच्या पवनार येथील निसर्ग ओळख केंद्र विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या केंद्रात वन्य प्राण्यांसंदर्भात आवश्यक माहिती राहणार आहे. शिवाय औषधी वनस्पतीचीही माहिती भेट देणाऱ्यांना उपलब्ध होणार आहे.सेलूकाटेमध्ये पाण्याच्या समस्येने वाढविली अडचणवर्धा तालुक्यातील सेलूकाटे येथे तयार करण्यात येणाऱ्या विशेष केंद्रासाठी १० कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचा अंदाज आहे. असे असले तरी तेथे पाण्याची समस्या निर्माण झाल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या समस्येवर लवकरच मात करण्यात येईल, अशा विश्वास वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.अंदाजपत्रकाला हिरवी झेंडी मिळताच कार्यवाहीसदर चारही केंद्राचा डिपीआर तयार करून तो येथील उपवनसंरक्षक कार्यालयाने संबंधितांना पाठविला. त्या डिपीआरला इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डने मंजुरी दिली आहे. त्यानंतर वन विभागाने अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविले. मात्र, ते अंदाजपत्रक सध्या त्याच्याकडे धुळखात आहे. अंदाजपत्रकाला हिरवी झेंडी मिळताच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले.बोटिंगचा आनंद लुटला येणारजिल्ह्यात पवनार, सेलूकाटे, गुंजखेडा, सारंगपुरी, बोर व ढगा येथे निसर्ग ओळख केंद्र तयार करण्याचे पूर्वी निश्चित करण्यात आले होते. परंतु, या विषयाला अंतिम स्वरूप देताना बोर व ढगा हे ठिकाण वगळण्यात आले. सदर चारही ठिकाणी प्रामुख्याने साहसी खेळ, बच्चेकंपनीसाठी बगीचा, वन उद्यान, मचांग आदी तयार करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी बोटींगची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याने नागरिकांना त्याचा आनंद लुटला येणार आहे.

टॅग्स :PavnarपवनारSewagramसेवाग्राम