शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या स्वच्छता निविदेकडे कंत्राटदारांची पाठ

By admin | Updated: May 27, 2017 00:32 IST

पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, गटारांची पालिका प्रशासनाकडून स्वच्छता करण्यात येते.

सफाई कर्मचाऱ्यांवर बोझा : सात मोठ्या नाल्यांच्या सफाईला सुरूवात लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, गटारांची पालिका प्रशासनाकडून स्वच्छता करण्यात येते. यावर्षीच्या कामाकरिता पालिकेने नियोजन केले असून या कामाचे कंत्राट देण्यात येते. पालिकेच्या वतीने निविदा काढण्यात आली तरी कंत्राट घेण्यासाठी अद्याप कंत्राटदारांनी रूची दर्शविलेली नसल्याची माहिती आहे. पालिकेच्या कारभाराला कंटाळून कंत्राटदारांनी निविदेकडे पाठ तर फिरविली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यापुर्वीच्या नाले व गटार सफाई कामांना २२ मे पासून प्रारंभ करण्यात आला. यात सुरुवातीला मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. या कामाचा भार सध्यस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांवर आहे. कंत्राटदार निश्चित झाला नसल्याने पालिकेचे अधिकारी नागरिकांना त्रास होवू नये याकरिता सफाई कामगार व मजुरांच्या माध्यमातून नाल्या सफाईचे काम करून घेत आहे. शहरात सात मोठे नाले असून ११ मध्यम नाले आहे. सांडपाण्याकरिता असलेल्या शहरातील विविध प्रभागातील नाल्या या गटारांना जोडण्यात आल्या आहे. या मोहिमेत लहान नाल्याची सफाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे सदर मोहीम राबविताना अतिरिक्त कामगारांची गरज भासणार आहे. याकरिता पालिकेच्यावतीने सदर कामाचे कंत्राट देण्यात येते. मात्र या कामाकरिता अद्याप कंत्राटदाराकडून प्रस्ताव आलाच नसल्याने सदर काम संथगतीने सुरू आहे. शहरांतर्गत स्वच्छतेच्या कामांनाही प्रारंभ या मोहिमेत गटारांचे खोलीकरण करून त्यातील गाळ व कचरा उपसण्यासाठी जेसीबी व पोकलँडचा वापर करण्यात येणार आहे. कचऱ्याची ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा कंत्राटदार नसल्याने पालिकेच्या यंत्रणेलाच संपूर्ण तयारी करावी लागत आहे. शहरातील ७ मोठ्या नाल्यांचे सफाई करण्यासाठी मजुरांची तरतूद करण्यात आली असून सफाई कामगारावर याचा बोझा येत आहे. पालिकेच्या आढावा बैठकीत पावसाळ्यापूर्वी नियोजनावर चर्चा झाली. यात कंत्राट देण्याचे निश्चित करण्यात आले; मात्र कंत्राटदारांनी याकडे पाठ का फिरविली यावर प्रश्नचिन्हच आहे.