शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कापूस खरेदीला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:44 IST

सध्या तालुक्यात ४ खरेदी केंद्र सुरू आहेत. यात चोरडिया इंडस्ट्रीज नंदोरी, सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज जाम, कनक अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज जाम व प्रकाश हॉईट गोल्ड उबदा यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देयंदा पेरा वाढला असला तरी उत्पादनातील घट कायमच

सुधीर खडसे ।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : सध्या तालुक्यात ४ खरेदी केंद्र सुरू आहेत. यात चोरडिया इंडस्ट्रीज नंदोरी, सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज जाम, कनक अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज जाम व प्रकाश हॉईट गोल्ड उबदा यांचा समावेश आहे. खासगी व्यापारी कापूस खरेदी सुरू असून सीसीआय व कॉटन फेडरेशनची खरेदी मात्र बंद आहे. सध्या शेतकºयांना ४३०० ते ४७०० रुपयांपर्यंत भाव दिले जात आहे. यावर्षी कापसाच्या पेºयामध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारपर्यंत २६ हजार १२३ क्विंटलची खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तालुक्यात दोन ठिकाणी खासगी खरेदी चालू असून त्यावर मार्केट कमेटीचे कोणतेही नियंत्रण नाही. तालुक्यात कापूस खरेदीला अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे.अवेळी अधिक पाऊस झाल्यामुळे पहिले येणारे कापसाचे बोंड सडले. बोंडावर किड पडली असून शेतकºयांचा कापूस ‘रेन डॅमेज’ झाला. यामुळे त्याला कमी भाव देण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत कमी प्रमाणात कापूस मार्केटमध्ये आला. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कापसाचा पेरा वाढला आहे. सध्या ४३०० ते ४७०० रुपयांपर्यंत भाव चालू आहे. सध्या आवक नसल्याने कापसाचे भाव वाढले असून आवक वाढल्यावर पुन्हा कापसाचे भाव कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- अभिषेक कोठारी, कनक अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, जाम.रूईच्या गाठीमध्ये वाढ नसून सरकीमध्ये मंदी चालू आहे. मागील वर्षी गाठीचे भाव ४४ हजार रुपये होते. यावर्षी ३८ हजार रुपये आहेत. सरकीचे भाव मागील वर्षी २८०० होते. यावर्षी १९०० रुपये आहेत. यामुळे शेतकºयाला हा जो भाव मिळत आहे, त्यापेक्षा अधिक भाव देणे परवडणारे नाही.- रमाकांत जाजोदिया, सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज, जाम.मागील वर्षी कापूस वेचाई १२० ते १३० रुपये २० किलोचा दर होता. यावर्षी १७० ते २०० रुपये दर आहे. मागील वर्षीपेक्षा मजुरी २५ टक्क्यांनी वाढली असून उत्पादन घटले आहे. कपाशीवर लाल्या रोग आल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.- शफात अहमद पटेल, शेतकरी, कोल्ही.जंगली जनावरांच्या त्रासाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चिता नक्षत्रात झालेल्या पावसाने बोेंड ओले झाले. यामुळे ‘रेन डॅमेज’ झालेला कापूस ३३०० रुपये भावाने विकावा लागला. बिटी बियाणे भेसळयुक्त मिळाल्याने त्याचाही परिणाम उत्पादनावर झाला आहे. या हंगामात कापूस पिकावर अनेक रोगांनी थैमान घातला. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. डिझेल महाग झाल्याने कापूस वाहतुकीचा खर्चही दीड टक्क्याने वाढला आहे.- कृष्णराव व्यापारी, शेतकरी, रा. वाघेडा.