शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी दिली स्टेट बँक प्रशासनाला तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:29 IST

येथील भारतीय स्टेट बँक इंडियाच्या मुजोर अधिकाऱ्यांना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी जनतेच्या समस्या सोडविण्याची तंबी दिली. आमदारांच्या या बॅक भेटीमुळे उपस्थित अनेक ग्राहक व शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागल्या.

ठळक मुद्देसेलू येथील शाखेला भेट : बीपीएलधारकाला बँक खाते काढण्यासाठी पॅनकार्डची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील भारतीय स्टेट बँक इंडियाच्या मुजोर अधिकाऱ्यांना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी जनतेच्या समस्या सोडविण्याची तंबी दिली. आमदारांच्या या बॅक भेटीमुळे उपस्थित अनेक ग्राहक व शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागल्या.येथील स्टेट बँकेत अनेक शेतकऱ्यांचे खाते आहे. त्यांनी पीक कर्जासाठी बँकेकडे प्रकरण सादर केले आहे. पण येथील बँकेचे अधिकारी सागर येवले हे ग्राहकांशी उद्धटपणे बोलून त्यांना पीककर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतात अशी तक्रार तालुक्यातील मोहन गुजरकर, दशरथ आत्राम, गंगाधर शेंदरे, नितीन अग्निहोत्री, रामू मुडे, पुरूषोत्तम वैरागडे, दीपक कांबळे, प्रशांत माहुरे यांसह आणखी काही शेतकऱ्यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याकडे केली होती. आमदारांनी बुधवारी सकाळी ११ वाजता बॅक गाठून बँकेत उपस्थित प्रभारी अधिकारी उषा उके यांना वरील शेतकºयांच्या पीक कर्जाविषयी विचारणा केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. येत्या आठ दिवसाचे आत सर्व शेतकºयांच्या समस्या सोडवून मला त्याबद्दल माहिती द्या व बँकेत येणाºया प्रत्येकांना सौजन्याची वागणूक द्या अशी तंबी दिल्यानंतर प्रभारी व्यवस्थापक उषा उके यांनी सर्व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन जनतेसमक्ष आमदारांना दिले.या बँकेचे नियमित ग्राहक असलेले व या बॅकेचे नियमित कर्ज फेडणारे महाबळा येथील शेतकरी मोहन गुजरकर यांना तुम्ही आमच्या बँकेच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे कारण देत त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे आमदारांनी व्यवस्थापकांच्या लक्षात आणून देताच त्यांची भंबेरी उडाली. असाच काहीसा प्रकार वडगाव येथील ज्येष्ठ नागरिक दारिदय रेषेखालील दशरथ आत्राम यांना बँकेत खाते काढण्यासाठी पॅन कार्डची अट घातल्याची व्यथा आत्राम यांनी आमदारा समोर मांडली असता आमदारांनी पॅनकार्डची गरज तीन लाख रुपयाचे वर उत्पन्न असलेल्या साठीच आहे ही बाब व्यवस्थापकांच्या निदर्शनात आणून देत त्यांचे ताबडतोब बँक पासबुक देण्याचे बजावले.आमदारांच्या बँक भेटीदरम्यान त्यांचे सोबत तालुका भाजपाध्यक्ष अशोक कलोडे, बाजार समितीचे संचालक विलास वरटकर, भाजयुमो अध्यक्ष विकास मोटमवार, चंदू वंजारी, न.प. सदस्य शैलेंद्र दप्तरी आदी उपस्थित होते. याच बॅकेत काही दिवसापूर्वी एका शेतकऱ्याला बॅक अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. सेलू तालुक्यात बॅकांमध्ये शेतकरी व नागरिकांना चांगली सेवा दिली जात नाही त्यामुळे यापूर्वीही आमदारांनी हिंगणी बॅकेत भेट दिली होती.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयरSBIएसबीआय