शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा खोली रामभरोसे सोडून पर्यवेक्षक मोबाईलवर व्यस्त!

By महेश सायखेडे | Updated: March 6, 2023 19:52 IST

हमदापूर येथील यशवंत हायस्कूल मधील वास्तव

वर्धा : जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त अभियान राबविले जात आहे. यासाठी शिक्षण तसेच शासनाच्या इतर विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले जात आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूर्वीच स्पष्ट केले असले तरी परीक्षा खोली रामभरोसे सोडून पर्यवेक्षक चक्क मोबाईलवर व्यस्त असल्याची धक्कादायक बाब भरारी पथकाच्या पाहणीत पुढे आली आहे.

सोमवार ६ मार्चला दहावी बोर्ड परीक्षेचा इंग्रजी या विषयाचा पेपरसाठी वर्धा जिल्ह्यात ७४ केंद्रावर ४ हजार ९२३ विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी ४ हजार ८२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ९६ विद्यार्थी गैरहजर राहिले. विभागीय मंडळानी नियुक्त केलेले सहा भरारी पथके यांनी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तर उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या भरारी पथकांनी हमदापूर येथील यशवंत हायस्कूल येथे भेट दिली. पथकातील अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांत जात पाहणी केली असता एक पर्यवेक्षक परीक्षा खोली सोडून बाहेर मोबाईलवर बोलत असल्याचे निदर्शनास आले.

भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी विचारणा केल्यावर संबंधित पर्यवेक्षकाने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी पर्यवेक्षकाचा मोबाईल जप्त केला. शिवाय शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्र संचालकांना संबंधितावर गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले आहे. भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची झडती घेतली असता एका विद्यार्थ्याजवळ कॉपी आढळल्यामुळे त्या कॉपीबहाद्दरवर कारवाई करण्यात आली आहे.खरांगणाच्या स्वावलंबीत विद्यार्थिनी झाली बेशुद्धजिल्ह्यात गैर प्रकाराला आळा घळण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेशही लागू केला आहे. सोमवारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या भरारी पथकाने स्वावलंबी विद्यालय खरांगणा या परीक्षा केंद्रावर भेट दिली असता तेथील एक विद्यार्थिनी पेपर सुरु झाल्याबरोबर बेशुद्ध झाली. भरारी पथकांनी तिला तात्काळ ग्लुकोज, बिस्कीट दिले. शिवाय वैद्यकीय उपचार केले. शुद्धीवर आलेली विद्यार्थिनी पेपर सोडविण्याच्या स्थितीत नव्हती. भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी बोर्डातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून तात्काळ स्वतंत्रपणे लेखनिक उपलब्ध करून दिला.

टॅग्स :wardha-acवर्धाwardha-pcवर्धाexamपरीक्षा