शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

वर्धा जिल्ह्यात पक्षाच्या मेळाव्याकडे आमदारासह नेत्यांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 14:29 IST

भाजपच्या सिंदी शहर समितीतर्फे १० मार्चला आयोजित शक्ती केंद्र, बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात काही जणांचा अपवाद वगळता बहुतेकांनी दांडी मारली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: भाजपच्या सिंदी शहर समितीतर्फे १० मार्चला आयोजित शक्ती केंद्र, बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात काही जणांचा अपवाद वगळता बहुतेकांनी दांडी मारली. स्वत:च्याच पक्षाच्या आयोजनाला दिलेली बगल पाहता भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे.मेळाव्याला आपसांतील गटबाजीमुळे अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आमदार समीर कुणावार, जिल्हा विस्तारक जयंत उर्फ गुंडू कावळे, अर्चना वानखेडे, भाजपचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी यांनी मेळाव्यात येण्याचे टाळले. या घटनाक्रमाने भाजपमधील गटबाजीच्या चर्चेला उधाण आले आहे.या मेळाव्यात शहरातील दोन शक्ती प्रमुखापैकी सुनील शेंडे हे एकच शक्तीप्रमुख उपस्थित होते. नगरसेवक प्रकाश मेंढे, प्रकाश सिरसे, नरेंद्र सेलूकर, नगरसेवक अमोल बोंगाडे, इम्रान पठाण, अमोल गवळी, पंकज पराते, प्रभाकर तुमाणे, अनिल साखळे हे शहरातील १० बूथप्रमुख आहेत. ते प्रामुख्याने गैरहजर होते. भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर घवघवे वगळता सरचिटणीस सुनील वाणकर, प्रशांत बोरीकर, संघटक जयंत बडवाईक, कोषाध्यक्ष संजय इटनकर, ओमप्रकाश राठी, मधुकर गुल्हाने, प्रवीण सिर्सिकर यांनी अनुपस्थित राहून रोष व्यक्त केला.भाजपच्या गटनेत्या तथा नगरसेविका अजया साखळे, बांधकाम सभापती बबिता तुमाणे, वंदना सेलूकर, पुष्पा सिरसे, चंदा बोरकर, अमोल बोंगाडे, प्रकाश मेंढे या भाजपच्या नगरसेवकांनीही मेळाव्याकडे पाठ फिरविली. या मेळाव्यात १६ कार्यकर्ते, नगराध्यक्ष संगीता शेंडे, उपाध्यक्षा वंदना डकरे, भाजपचे विस्तारक पवन परियाल, शहर अध्यक्ष सुधाकर घवघवे यांचीच उपस्थिती होती.हॉलमध्ये प्रमुख पाहुण्यांकरिता लावलेला स्टेज संख्येअभावी खाली घेण्याची नामुष्की भाजपवर ओढवली. या सर्व घटनेची माहिती आमदार समीर कुणावार यांना मिळाल्याने मेळाव्याचे प्रमुख असूनही ते इकडे फिरकले नाही.भाजपची नगरपालिकेत सत्ता आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि आठ नगरसेवक, शहरातील पतसंस्था, सोसायट्यांमध्ये पक्षाचे अनेक संचालक आहेत. पक्षाच्या विविध शाखांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची लांबच लांब फळी असतानाही मेळावा अपयशी ठरला. सध्या सभोवतालच्या २५ पेक्षा अधिक गावांत ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे, तर लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. अशा स्थितीत भाजपातील दुफळी चर्चेचा विषय ठरत आहे.

टॅग्स :BJPभाजपा