शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

सुपिक जमिनीवर ले-आऊटचा फलक

By admin | Updated: March 27, 2016 02:11 IST

ले-आऊटच्या नावावर लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. धानोली येथेही असाच एक फलक लावण्यात आला असून बुकींगही सुरू केले आहे.

फसवणुकीचा प्रयत्न : अवैध व्यवसाय तेजीतसेलू : ले-आऊटच्या नावावर लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. धानोली येथेही असाच एक फलक लावण्यात आला असून बुकींगही सुरू केले आहे. वास्तविक, सदर ले-आऊट अद्याप मंजूर नसून एन.ए., टी.पी. मंजूर नसल्याचे समोर आले आहे.येथून एक किमी अंतरावर धानोली (मेघे) येथे डांबरी रस्त्यालगत मौजा धानोली (मेघे), खसरा नं. १६६/१ जमीन शेतमालकाकडून विकत घेतली. अत्यंत सुपिक असलेल्या या जमिनीवर रात्रीतून ले-आऊट टाकून मधे सिमेंटचे छोटे दगड गाडले. स्वस्त दरात व मासिक किस्तीवर प्लॉट उपलब्ध म्हणून मोठा फलक लावला. एवढेच नव्हे तर परवानगी नसताना, जमीन कृषक असताना एन.ए., टी.पी. असा फलकही लावला. संपर्कासाठी राजेंद्र, अभिजित, सचिन असे आडनाव नसलेली नावे टाकून त्यापुढे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना उघडपणे फसविण्याचा हा प्रकार सुरू आहे. यात यापूर्वी अनेकजण फसले गेले आहे. सेलूतही एका ले-आऊट मालकाने ५० पेक्षा अधिक प्लॉट लोकांना विकले. तेच प्लॉट बँकेला गहाण करून कोट्यवधी रुपये कर्ज घेतले. सदर प्रकरण सेलू पोलिसात दाखल आहे. धानोली येथे तर ले-आऊट मालकाने परवानगी नसताना शेतात अनधिकृत फलक लावला. या ले-आऊट मालकावर महसूल विभागाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)